Maharashtra Police Bharti 2020: महाराष्ट्र पोलिस दलातील भरती साठी कशी कराल तयारी? लवकरच 12,500 जागांसाठी निवडले जाणार उमेदवार
महाराष्ट्र पोलिस भरती 2020 साठी कशी कराल तयारी हे जाणून घ्या
Maharashtra Police Constable Recruitment 2020: सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकारने सुमारे 12,500 जागांवर पोलिस भरती (Maharashtra Police Bharti ) होणार असल्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात मागील 5-6 महिन्यांपासून कोरोना व्हायरसचं संकट घोंघावत आहे. यामध्ये फ्रंट लाईन वर्कर्स म्हणून महाराष्ट्र पोलिस देखील आपलं कर्तव्य बजावत आहे. यामध्ये अनेकांना कोविड 19 च्या आजारपणामुळे मृत्यू ओढावला आहे. सध्या मोठ्या तणावाखाली असलेल्या महाराष्ट्र पोलिस दलाला या पोलिस भरतीमुळे मोठं बळ मिळणार आहे. तसंच आरोग्य संकटासोबतच आर्थिक संकटाचा सामना करताना बेरोजगारीचं प्रमाण वाढलं असताना पोलिस भरतीच्या माध्यमातून मोठ्या सरकारी नोकरीची संधी राज्यातील तरूण-तरूणींसमोर आहे. मग या परिस्थितीमध्ये तुम्ही देखील पोलिस भरती 2020 साठी सज्ज होत असाल तर जाणून घ्या या पोलिसभरती बद्दल काही महत्त्वाची माहिती. दरम्यान पोलिस भरती ही जाहीर झाली असली तरीही त्याची जाहिरात अद्याप प्रसिद्ध करण्यात आली नाही. त्यामुळे या भरतीची प्रवेश प्रक्रिया, निकष, परीक्षा याबाबत स्पष्टता नाही. लवकरच त्याची घोषणा करून पोलिस भरतीला वेग येऊ शकतो. मात्र तो पर्यत इच्छुक उमेदवार काय करू शकतात? हे नक्की जाणून घ्या. 12 हजार 538 पदांची भरती प्रक्रिया डिसेंबर पर्यंत पूर्ण करणार; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती.
महाराष्ट्र पोलिस भरती 2020 साठी कशी कराल तयारी
- महाराष्ट्र पोलिस भरती जाहीर झाली आहे मात्र अद्याप त्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही त्यामुळे वेळेवेळी या भरतीचे अपडेट्स मिळवण्यासाठी mahapolice.gov.in/Recruitment अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- पोलिस भरतीसाठी आतापर्यंत लेखी आणि शारिरीक परीक्षा अशा दोन परीक्षा घेऊन त्याच्या निकालावर उमेदवार निवडले गेले आहेत.
- लेखी परीक्षेसाठी तयारी करताना तुम्हांला सामान्यज्ञान, ताज्या घडामोडी, राज्याचा भूगोल, इतिहास, नागरिक शास्त्र आणि मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यासंबंधी वाचन करायची सवय ठेवा.
- अवांतर वाचनासोबत मराठी, इंग्रजी बातम्या ऐकायला, पहायला, संपादकीय वाचण्याची सवय ठेवा म्हणजे तुमची भाषा सुधारेल आणि देशा-परदेशात सुरू असलेल्या घडामोडींची माहिती मिळेल.
- लेखी परीक्षेइतकीच शारिरीक चाचणी परीक्षा देखील उमेदवार निवडीसाठी आवश्यक असते. यामध्ये तुमचा फीटनेस तपासला जातो. त्यामुळे व्यायामाची सवय ठेवा, तुमचा स्टॅमिना वाढवा.
- चालणं, धावणं यासारख्या व्यायामप्रकारांचा तुमच्या नेहमीच्या व्यायामामध्ये अवश्य समावेश करा.
- फीटनेस सुधारण्यासाठी जीवनशैलीमध्ये चांगले बदल करा, पोषक आहार, शांत झोप आणि व्यायाम याची सवय ठेवा म्हणजे आपोआपच तुमचा स्टॅमिना सुधारण्यासाठी मदत होऊ शकते.
सर्वसाधारणपणे अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धीमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या विषयांची 100 गुणांची लेखी परीक्षा आणि महिला व पुरूषांसाठी वेगवेगळ्या निकषांनुसार 50 मार्कांची शारिरीक चाचणी परीक्षा घेण्यात येते. परंतू यंदाच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे संबंधित विभागाकडून त्याची अधिकृत माहिती देणारे नोटिफिकेशन पाहण्यासाठी वेळोवेळी पोलिस खात्याच्या संकेतस्थळाला भेट द्या.