कांद्याचे दर लवकरच 30 रुपये किलो होणार, सामान्यांना मिळणार दिलासा

तर गुरुवारी महाराष्ट्रातील लासलगाव येथील एका कांदा बाजारात त्याचे वाढलेले दर कमी झाले असून आता 30 रुपये किलोने त्याची विक्री केली जात आहे.

Onions (Photo Credits: IANS)

देशभरात वाढलेल्या कांद्याचे दर लवकरच कमी होणार आहेत. तर गुरुवारी महाराष्ट्रातील लासलगाव (Lasalgaon) येथील एका कांदा बाजारात (Onion Market) त्याचे वाढलेले दर कमी झाले असून आता 30 रुपये किलोने त्याची विक्री केली जात आहे. असे सांगितले जात आहे की, शासनाकडून कांद्याच्या निर्यातीवर प्रतिबंध आणि उत्पादकांकडील कांद्याची साठवण यांच्यामुळे त्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे.

राष्ट्रीय बागवानी अनुसंधान अॅन्ड विकास प्रतिष्ठान यांच्या मते, सप्टेंबर महिन्याच्या नाशिक जिल्ह्यात कांदा 51 रुपये किलोने विकला जात होता. तर लासगाव बाजारात कांद्याचा भाव ठरवला जातो. या बाजारातील कांद्याच्या भावात होणारी चढउतार याचा परिणाम देशातील अन्य ठिकाणच्या किंमतीवर ही होतो. तर लासलगाव येथे कांद्याचा भाव 26 रुपये प्रति किलो झाला. तर कांद्याचे जास्तीत जास्त दर 30.29 रुपये किंवा कमीत कमी 15 रुपये किलो झाली.

ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक सारख्या कांदा उत्पादकांनी त्याच्या किंमतीत वाढ केली होती. त्याचसोबत दिल्ली आणि एनसीआर मधील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी मदर डेयरी 23.90 रुपयांनी कांद्याची विक्री करत आहेत.(नाशिक येथे 1 लाख रुपयांचा कांदा चोरीला, उत्पादकाकडून पोलिसात तक्रार दाखल)

गेल्या आठवड्यात दिल्ली येथे गेल्या कांद्याचे दर 57 रुपये प्रति किलो होते. तर मुंबईत 56 रुपये, कोलकाता येथे 48 रुपये आणि चेन्नई येथे कांद्याचा दर 34 रुपये किलो होता. तसेच कांद्याच्या दरात वाढ झाली असून त्याचे दर 70-80 रुपयांच्या घरात पोहचले आहेत.

तसेच वाढत्या कांद्याच्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली होती. एवढेच नाही तर नाशिक येथून तब्बल 1 लाख रुपयांचा कांदा चोरीला गेल्याची घटना समोर आली. या प्रकरणी कांदा उत्पादकाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याबाबत अधिक तपास केला जात आहे.