Maharashtra New Home Minster: अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री
तर अनिल देशमुख यांच्यावर वसूलीचा आरोप लावण्यात आल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी सातत्याने मागणी विरोधकांकडून केली जात होती.
अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे त्या पदाचा कारभार सोपवण्यात आला आहे. तर अनिल देशमुख यांच्यावर वसूलीचा आरोप लावण्यात आल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी सातत्याने मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र आज अखेर त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवत नैतिकतेच्या आधारावर दिल्याचे म्हटले आहे. दरम्यान मुंबई पोलीस दलातील माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसूलीचा आरोप लावल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. याप्रकरणी बॉम्बे हायकोर्टात सुनावणी सुद्धा पार पडली.
तर अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. श्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे.(अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर नवा वसुली मंत्री कोण? चित्रा वाघ यांची महाविकास आघाडी सरकारवर टीका)
Tweet:
आज कोर्टाने सुनावणी करत वसूली प्रकणी सीबीआय तपासासाठी परवानगी दिली आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा दिल्याचे समोर आले होते. कोर्टाने पुढे असे ही म्हटले की, सीबीआयकडून आता लगेच या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार नाही आहे. याचिकेवर आपला निर्णय देत बॉम्बे हायकोर्टाने म्हटले या प्रकरणी आयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासातून अपील करण्यात आले होते. तर अनिल देशमुख यांच्यावर आरोप लावल्याने तेच राज्याचे गहमंत्री आहेत. अशातच स्पष्टपणे तपास होण्यासाठी मुंबई पोलिसांवर निर्भर राहू शकत नाहीत. त्यामुळे सीबीआयने या प्रकरणी तपास करावा.