Maharashtra New COVID-19 Guidelines: कोरोना निर्बंध शिधील,14 जिल्ह्यांमध्ये नाट्यगृहे, सिनेमागृहे 100% खुली
राज्य सरकारने याबाबत एक नवी नियमावली (Maharashtra New COVID-19 Guidelines) आजच (2 फेब्रुवारी) जारी केली आहे. ही नियमावली येत्या 4 मार्चपासून लागू असणार आहे. प्रामुख्याने ही नियमावली 14 जिल्ह्यांसाठी असेल.
राज्य सरकारने कोविड-19 महामारी काळात लागू केलेले प्रतिबंध मोठ्या प्रमाणावर शिथील केले आहेत. राज्य सरकारने याबाबत एक नवी नियमावली (Maharashtra New COVID-19 Guidelines) आजच (2 फेब्रुवारी) जारी केली आहे. ही नियमावली येत्या 4 मार्चपासून लागू असणार आहे. प्रामुख्याने ही नियमावली 14 जिल्ह्यांसाठी असेल. त्यामुळे या जिल्ह्यांतील नाट्यगृहे, सिनेमागृहे, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे 100% क्षमतेने सुरु होतील. इतर जिल्ह्यांमध्ये मात्र 50% ही अट कायम असणार आहे.
राज्य सरकारने ज्या 14 जिल्ह्यांमध्ये 100% क्षमतेची मुभा दिली आहे त्यात, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, पुणे, भंडारा,सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समवेश आहे. उर्वरीत जिल्ह्यांना 50% उपस्थितीत नाट्यगृहे, सिनेमागृहे, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे सुरु करण्यास परवानगी असणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना 100% उपस्थितीची परवानगी मिळण्यास काही काळ तरी वाट पाहावी लागणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारने आज जाही केलेल्या नव्या नियमावलीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विवाह सोहळे, धार्मिक कार्यक्रम आदी कार्यक्रमांना एकूण क्षमतेच्या 50% इतकी परवानगी देण्यात आली आहे. या जिल्ह्यांमधील सरकारी, निमसरकारी आणि खासगी कार्यालये मात्र पूर्ण क्षमतेने सुरु राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.