Maharashtra New Chief Minister: 'महाराष्ट्राला 26 नोव्हेंबरपर्यंत नवीन मुख्यमंत्री मिळणार', महायुतीच्या दणदणीत विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचा दावा

मात्र, महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही. यावेळी भाजपला मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळेल असा दावा करणारे अनेक अहवाल समोर आले आहेत.

Devendra Fadnavis (Photo Credit: X/@ANI)

Maharashtra New Chief Minister: महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी अजूनही काही ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. मात्र निकाल पाहता भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) यांची महायुती राज्यात सत्ता स्थापन करणार असल्याचे निश्चित झाले आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा सादर करणार असल्याची घोषणा केली आहे. अशात आता संपूर्ण महाराष्ट्रासह देशात उत्सुकता आहे ती म्हणजे, राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार याबाबत. महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत वाद नसल्याचे महायुतीच्या नेत्यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

‘भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष आधी आपल्या नेत्यांची नियुक्ती करतील आणि त्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होईल. काळजी करू नका, चित्र स्पष्ट होईल आणि 26 नोव्हेंबरपर्यंत राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी संध्याकाळी माध्यमांशी बोलत होते.

निवडणूक आयोगाने अधिकृतपणे अंतिम निकाल जाहीर केला नसला तरी, भाजप-महायुती नवीन सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही. यावेळी भाजपला मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळेल असा दावा करणारे अनेक अहवाल समोर आले आहेत, जे देवेंद्र फडणवीस हे पुढील मुख्यमंत्री होतील, असा इशारा करतात.

महायुती पत्रकार परिषद-

सध्याच्या सरकारचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपत आहे. त्याआधी नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव समोर येईल अशी अपेक्षा आहे. राज्य विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी ही महायुतीला टक्कर देईल आणि स्पष्ट बहुमत मिळणार नाही अशी अपेक्षा होती. मात्र, प्रचंड जनादेशामुळे महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल याची खात्री झाली आहे. शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीवर विश्वास ठेवल्याबद्दल महाराष्ट्रातील नागरिकांचे आणि विशेषतः महिलांचे आभार मानले. (हेही वाचा: PM Narendra Modi Hails Mahayuti's Maharashtra Victory: 'हा विकासाचा, सुशासनाचा विजय आहे'; महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयावर पीएम नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया)

महाराष्ट्राच्या राजकारणात आता सर्वांच्या नजरा 26 नोव्हेंबरला लागून आहेत, कारण त्याच दिवशी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होऊ शकतो. त्याआधी  25 नोव्हेंबरला महायुतीतर्फे विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून, त्यात मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याची निवड केली जाणार आहे. नव्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा वानखेडे स्टेडियमवर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी 2014 मध्येही याच वानखेडे स्टेडियमवर शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif