Maharashtra Legislative Council Elections: राष्ट्रवादीकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी दोन नावं जवळपास निश्चित, शरद पवारांच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा
अशा वेळेस राष्ट्रवादीकडून दोन नावं जवळपास निश्चित झाली आहेत. यामध्ये राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि युवा नेते अमोल मिटकरी यांची नावं निश्चित झाल्याचं समोर येत आहे. मात्र, यांच्या नावांवर निश्चितता पक्षप्रमुख शरद पवार यांच्या निर्णयानंतरच लागेल.
महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरस दरम्यान 21 मे रोजी विधान परिषदेची निवडणूक (Legislative Council Elections) होणार आहे. महाविकासआघाडीत कोणा-कोणाला संधी मिळणार यावर सर्वांचे लक्ष लागून आहे. अशा वेळेस राष्ट्रवादीकडून दोन नावं जवळपास निश्चित झाली आहेत. यामध्ये राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आणि युवा नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची नावं निश्चित झाल्याचं समोर येत आहे. यापूर्वी, शिवसेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांची नावं यापूर्वीच निश्चित झाली आहेत आणि आता काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून शिंदे आणि मिटकरी यांच्या नावांवर निश्चितता पक्षप्रमुख शरद पवार यांच्या निर्णयानंतरच लागेल. काँग्रेसही 2 जागांसाठी उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, शिंदे यांना माथाडी कामगार नेते म्हणून ओळखले जाते, तर मिटकरी यांनी विधानसभेच्या निवडणुकीवेळी जोरदार प्रचार केला होता. त्यांची भाषणं भरपूर गाजली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मिटकरी यांचं अनेकदा जाहीरपणे कौतुक केलं आहे. (Maharashtra Legislative Council Elections: भाजप नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा)
कोरोना व्हायरसचा उद्रेक लक्षात घेता 24 एप्रिल रोजी रिक्त झालेल्या कौन्सिलच्या नऊ जागांसाठी निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या, परंतु गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाने निवडणूकीची तारीख निश्चित केली. आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार म्हणून पदार्पण करण्याची संधी मिळणार आहे. राज्यपाल बी.एस. कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर कारवाई करत ठाकरे यांना आमदार म्हणून निवडून घेण्याची घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी त्यांनी निवडणुका घेण्याचे आवाहन केले होते. ठाकरे यांनी गेल्या वर्षी 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
दुसरीकडे, कॉंग्रेसने आपले उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत, परंतु गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत हरलेल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते नसीम खान हे आघाडीचे उमेदवार असल्याचे म्हटले जात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे विधानपरिषदेचा सदस्य होण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी आपल्या पक्षाला सांगितले आहे. “मला राज्याच्या राजकारणात रस आहे आणि मला विधानपरिषदेचा सदस्य व्हायचे आहे,” असे त्यांनी पीटीआयला सांगितले.