Amazon विरोधात MNS आक्रमक; मुंबईत झळकवली ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ ची पोस्टर्स
अॅमेझॉनकडून मराठी भाषेचा वापर व्हावा, अशी मागणी मनसे गेले अनेक दिवसांपासून करत आहे. आता मात्र मनसे ने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने अॅमेझॉनविरोधात ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ असा मजकूर लिहलेली पोस्टर्स मुंबईभर लावली आहेत.
अॅमेझॉनकडून (Amazon) मराठी भाषेचा वापर व्हावा, अशी मागणी मनसे (MNS) गेले अनेक दिवसांपासून करत आहे. आता मात्र मनसे ने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने अॅमेझॉनविरोधात ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ (No Marathi, No Amazon) असा मजकूर लिहलेली पोस्टर्स मुंबईभर लावली आहेत. एबीपी माझा च्या वृत्तानुसार, माहिम, अंधेरी, वांद्रे, बीकेसी यांसह इतर परिसरातही अशा प्रकारची पोस्टर्स लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे त्यावर 'तुम्हाला महाराष्ट्रात आमची मराठी भाषा मान्य नाही, आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही मान्य नाही' असा मजकूरही लिहिण्यात आला आहे.
मनसेचे नेते अखिल चित्रे यांच्याकडून ही पोस्टर्स लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अॅमेझॉन इतर राज्यांमध्ये संबंधित भाषेचा वापर करते. मात्र मराठी भाषेचा वापर अॅमेझॉनच्या अॅप किंवा वेबसाईटवर होताना दिसत नाही. त्यामुळे अॅमेझॉनने मराठी भाषेचा वापर करावा, अशी मागणी मनसे गेल्या काही दिवसांपासून करत आहे. या प्रकरणी मनसेच्या शिष्टमंडळाने अॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाला भेट देत आपली मागणी मांडली होती. (MNS Vs Amazon: अॅमेझॉन कंपनी विरोधात मनसेची ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ नवी मोहीम सुरु)
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोज यांनी मनसेच्या या मागणीची दखल घेतली होती. तसंच मराठीच्या वापराबद्दल सकारात्मक असल्याचं त्यांनी मेल द्वारे मनसेला कळवलं होतं. यासाठी अॅमेझॉनचं एक शिष्टमंडळ मुंबईत आलं होतं. मात्र दोन महिन्यानंतर मराठीच्या वापराबाबत कोणतंही पाऊल अॅमेझॉनकडून उचललं न गेल्यामुळे मनसे आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.
या प्रकरणी अॅमेझॉन कंपनीने न्यायालयात धाव घेतल्याने मनसेने अॅमेझॉन विरुद्ध 'नो मराठी, नो अॅमेझॉन' या मोहिमेला सुरुवात केली आहे. अॅमेझॉन वरुन बहुसंख्य मराठी भाषिक खरेदी करतात. त्यामुळे इतर भाषांप्रमाणे मराठी भाषेचा वापरही अॅमेझॉनने करावा, या मनसेच्या मागणीवरुन अॅमेझॉनने कोर्टात धाव घेत अॅपमध्ये मराठी भाषा समाविष्ट करु शकत नाही, असे म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 17, 2020 10:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

