महाराष्ट्र: महिलांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांची HOME DROP सेवा तर बीड पोलिसांची 'कवच' मोहिम; रात्री- अपरात्री इच्छित स्थळी पोहचवण्यास करणार मदत
बीडमध्ये पोलिसांची 'कवच' मोहिम सुरू केली असून त्याअंतर्गत मुलींना रात्री 9 ते सकाळी 5 दरम्यान प्रवास करणं असुरक्षित वाटत असेल तर त्यांच्या मदतीसाठी पोलिस स्वतः मोफत सेवा देणार आहेत.
काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये डॉक्टर तरूणीवरून बलात्कार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर देशातील तरूणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. आता या वातावरणात महाराष्ट्रामध्ये मुलींना रात्री-अपरात्री सुरक्षित प्रवास करता यावा याकरिता महाराष्ट्र पोलिसांनी स्वतःहून खास उपाय योजना करण्यास सुरूवात केली आहे. बीडमध्ये पोलिसांची 'कवच' मोहिम सुरू केली असून त्याअंतर्गत मुलींना रात्री 9 ते सकाळी 5 दरम्यान प्रवास करणं असुरक्षित वाटत असेल तर त्यांच्या मदतीसाठी पोलिस स्वतः मोफत सेवा देणार आहेत. दरम्यान नागपुर पोलिसांनीदेखील अशाच प्रकारे HOME-DROP सेवा सुरू केली आहे.
बीड पोलिसांच्या अधिकृत ट्वीटनुसार, बीड पोलीसांकडून “प्रोजेक्ट कवच” ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. एका फोन कॉलच्या माध्यमातून महिला अअणि तरूणींना रात्री 9 ते सकाळी 5 दरम्यान प्रवास करणं असुरक्षित वाटत असेल तर त्यांना बीड पोलिस स्वतः सुरक्षित घरी / इच्छित स्थळी पोहचवण्यास मदत करणार आहेत.
बीड पोलिस ट्वीट
दरम्यान पोलीस कंट्रोल रूम किंवा 1091 या क्रमांकवर फोन करून बीड पोलिसांकडून मदत मागता येऊ शकते. तसेच याकरिता एक मोबाईल अॅपदेखील लॉन्च करण्यात आले आहे.