BMC: मुंबई महापालिकेचा कारभार CAG तपासणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
ज्याची आगामी मुंबई महापालिका नवडणुकीच्या तोंडावर जोरदार चर्चा रंगली आहे. फडणवीस यांनी घोषणा केली आहे की, मुंबई महापालिकेच्या कारभाराचे विशेष ऑडीट भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (Comptroller and Auditor General of India) म्हणजेच कॅग (CAG) द्वारे करण्यात येणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ज्याची आगामी मुंबई महापालिका नवडणुकीच्या तोंडावर जोरदार चर्चा रंगली आहे. फडणवीस यांनी घोषणा केली आहे की, मुंबई महापालिकेच्या कारभाराचे विशेष ऑडीट भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (Comptroller and Auditor General of India) म्हणजेच कॅग (CAG) द्वारे करण्यात येणार आहे. राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे पाठिमागील अनेक वर्षे मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षास धक्का असल्याचे मानले जात आहे.
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात भारतीय जनता पक्षाच्या अनेक आमदारांनी मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. मुबईतील खराब रस्ते, कोरोना काळात महापालिकेने उभारलेली कोविड सेंटर्स, सार्वजनिक बांधकामांमधील अनियमीतता, याशिवाच बेस्ट बस खरेदी, मुंबई महापालिकेने वेळोवेळी राबवलेले उपक्रम या सर्वांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप आमदारांनी केला. यावर उत्तर देताना या सर्व व्यवहार आणि कामांचे कॅगद्वारे ऑडीट केले जाईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस घोषणा केली. (हेही वाचा, Amit Satam Statement: गेल्या 25 वर्षांत बीएमसीमध्ये 3 लाख कोटी रुपयांचा घोटाळा, अमित साटम यांचा आरोप)
मुंबई महापालिकेच्या कारभारावर चर्चा करताना भाजप आमदारांनी आरोप केला की, महापालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या स्वत:च्या नावे कंपन्या सुरु केल्या आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून हे लोक कामे करत असतात. या आरोपांवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, राज्याचा नगर विकास विभाग या सर्व कामांची कालबद्ध पद्धतीने चौकशी करेल.
भाजप आमदार आणि पक्षाचे विद्यमान प्रांताध्यक्ष आशिष शेलार यांनी आरोप केला की, मुंबई महापालिकेनेक राबवलेल्या 140 शाळांमधील व्हर्च्युअल क्लासरुम निविदेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत तक्रार केली असून त्याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेलार यांनी या वेळी केली. भाजप आमदार अमित साटम यांनी तर थेट गंभीर आरोप करत मुंबई महापालिकेत पाठिमागील 25 वर्षात 3 लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला.