Maharashtra Monsoon Forecast on 14th August: मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता तर कोल्हापूर, सांगलीत पुन्हा एकदा हायअलर्ट
कोल्हापूर, सांगलीतील तर रायगड (Raigad), कोकण (Konkan) भागातील पूरस्थिती ओसरत असून या भागाला पुन्हा एकदा हायअलर्ट देण्यात आला आहे
कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli) जिल्ह्यातील जनजीवन हळू हळू पूर्वपदावर येत असताना हवामान खात्याने या भागात पुढील 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. कोल्हापूर, सांगलीतील तर रायगड (Raigad), कोकण (Konkan) भागातील पूरस्थिती ओसरत असून या भागाला पुन्हा एकदा हायअलर्ट देण्यात आला आहे. गेले काही दिवस कोल्हापूर, सांगली सह रायगड जिल्ह्यात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. मात्र हवामान खात्याच्या अंदाजामुळे येथील नागरिकांनी पूराची टांगती तलवार अजूनही कायम असल्याची चिन्हे दिसत आहे.
तर मुंबईसह (Mumbai) इतर भागात आज मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तर विदर्भात मात्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
BMC चे ट्विट:
Skymet चे ट्विट:
हवामान विभागाने कोल्हापूर आणि सांगली सोबतच कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यातील रायगड जिल्ह्याला 16 तारखेपर्यंत मुसळधार पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील गेल्या दहा वर्षांमधील आॉगस्ट महिन्यापर्यंतची पावसाची आकडेवारी लक्षात घेता महापुराचा फटका बसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा 64 टक्के अतिरिक्त तर सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा 53 टक्के अतिरिक्त पाऊस झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पावसाच्या या रौद्र रुपाने या भागातील नागरिकांचे न केवळ संसार उघड्यावर पाडले तर जीवितहानी आणि वित्तहानीदेखील केली.