Maharashtra Monsoon 2020 Updates: मुंबई, ठाणे, मराठवाडा साठी पुढील 48 तास मध्यम ते जोरदार पावसाचे; 1 ऑगस्टपासून कोकण सह किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढणार

पुढील 24 ते 48 तास मुंबई, ठाणे मध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बरसेल असा अंदाज मुंबई हवामान वेधशाळेचे उपासंचालक के एस होसळीकर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे.

Unseasonal Rain | (Photo Credits: Pixabay)

मुंबई, ठाण्यामधून दडी मारलेला पाऊस आता पुन्हा बरसायला सुरूवार झाली आहे. काल पहाटेपासून मुंबई सह नजीकच्या शहरामध्ये धुव्वाधार बरसणारा पाऊस आता पुढील 24 तास जोरदार कोसळणार असण्याची शक्यता मुंबई हवामान वेधशाळेने वर्तवली आहे. दरम्यान पुढील 24 ते 48 तास मुंबई, ठाणे मध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बरसेल असा अंदाज मुंबई हवामान वेधशाळेचे उपासंचालक के एस होसळीकर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. दरम्यान मुंबई, ठाण्यासोबतच पुढील 48 तास मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागासाठी मध्यम आणि जोरदार पावसाचे असतील असे देखील सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात 1 ऑगस्ट पासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याची शक्यता देखील हवामानखात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई सह कोकणामध्येही पावसाचा जोर वाढणार आहे असे संकेत देण्यात आले आहे.

सध्या मुंबई शहरात पाणी साठा मागील वर्षाचा तुलनेत कमी असल्याने आता आगामी दिवसातील पाऊस दिलासादायक पडल्यास आणि तलाव क्षेत्रात बरसल्यास मुंबईकरांसमोरील पाणी संकटदेखील कमी होईल असा विश्वास आहे. अद्याप मुंबईमध्ये पाणीकपात जाहीर केलेली नाही.