Maharashtra Monsoon 2020 Forecast: मुंबई, ठाणे आणि कोकणातील काही भागांत पुढील 24 ते 48 तास मुसळधार पावसाची शक्यता- IMD
त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अधून मधून पावसाच्या सरी बरसत आहेत. परंतु, पुढील 24 ते 48 तास हे पावसाचे असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Maharashtra Weather Updates: मुंबई आणि राज्यातील अनेक ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अधून मधून पावसाच्या सरी बरसत आहेत. परंतु, पुढील 24 ते 48 तास हे पावसाचे असणार आहेत. मुंबई, ठाणे आणि कोकणातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान मागील 24 तासांत मुंबई आणि ठाणे येथे मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. अशी माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
10-11 ऑगस्टपासून मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर मान्सून पुन्हा सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. तसंच साधारण आठवडाभर ही स्थिती कायम राहणार असल्याचेही सांगण्यात आले होते. त्यामुळे काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. (मुंबई: भर पावसात 7 तास उभे राहून वाहनांना दिशा दाखवणाऱ्या कांता मुर्ती यांना BMC अधिकाऱ्यांचा दणका, Watch Video)
K S Hosalikar Tweet:
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले असले तरी त्यामुळे पाणी कपातीचे संकट टळण्याचा अंदाज आहे. तलावक्षेत्रात उत्तम पाऊस झाल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणारे विहार आणि तुळशी ही मुख्य धरणे भरली आहेत.