IPL Auction 2025 Live

Maharashtra Mlc Election 2020: विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची आज शेवटचा दिवस

विधानभवनात सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान पार पडेल. निवडणुकीची अधिसूचना 5 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाली होती. औरंगाबाद, पुणे, नागपूर येथे पदवीधर आणि अमरावती, पुणे येथील शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक पार पडत आहे.

Maharashtra MLC Election | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या पदवीधर ( Graduate Constituency Election 2020) आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी (Teacher Constituency Election 2020) अर्ज भरण्याची लगबग उमेदवार आणि राजकीय पक्षांकडून सुरु आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची आजची (12 नोव्हेंबर) शेवटची मुदत आहे. तर उद्या (13 नोव्हेंबर) अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस 17 नोव्हेंबर हा आहे. शिक्षक आणि पदवीधर अशा एकूण 5 मतदारसंघासाठी ही निवडणूक ( Maharashtra Mlc Election 2020) पार पडत आहे. या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर या दिवशी मतदान होणार आहे. विधानभवनात सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान पार पडेल. निवडणुकीची अधिसूचना 5 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाली होती. औरंगाबाद, पुणे, नागपूर येथे पदवीधर आणि अमरावती, पुणे येथील शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक पार पडत आहे.

दरम्यान, या निवडणुकीत जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत. नागपूर आणि औरंगाबाद मतदारसंघातून महाविकासआगाडी मध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांना सहकार्य करण्यावरुन संघर्ष आहे. तर, दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षातही सर्वच काही अलबेल आहे असे चित्र नाही. नाराज असलेल्या पंकजा मुंडे समर्थकांनी अपक्ष अर्ज भरण्याच्या हालचाली सुरु केल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा, Maharashtra Legislative Council Elections: नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या सह विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंंघाच्या निवडणूकीसाठी 4 भाजपा उमेदवारांची यादी जाहीर)

कोरोना व्हायरस संकट काळात घेण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर महाराष्ट्रात विधानपरिषदेसाठी पहिल्यांदाच निवडणूक पार पडत आहे. नाही म्हणायला या आधी एकदा निवडणूक झाली परंतू ती बिनविरोध झाली होती. या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी, भाजपचे गोपिचंद पडळकर, रमेश कराड आणि इतर काही चेहरे विधानपरिषदेवर गेले होते. आता या निवडणुकीत कोणते चेहरे विधिमंडळात पोहोचतात याबाबत उत्सुकता आहे.