Maharashtra MLC By-Election 2021: विधान परिषदेसाठी भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंह यांना उमेदवारी, शिवसेनेकडून सुनिल शिंदे यांच्या नावाची चर्चा
कोल्हापूर, धळे आणि नंदूरबार, नागपूर, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि मुंबई अशा एकूण पाच जागांसाठी ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या पाच जागांमध्ये माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अमल महाडिक, अमरीश पटेल, वसंत खंडेलवाल आणि राजहंस सिंह यांच्या नावाचा समावेश आहे.
महाराष्ट्र विधानपरिषद पोटनिवडणूक 2021 (Maharashtra MLC By-Election 2021) साठी भारतीय जनता पक्षाने (BJP) आपले उमेदवार जाहीर केले आहेत. कोल्हापूर, धळे आणि नंदूरबार, नागपूर, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि मुंबई अशा एकूण पाच जागांसाठी ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या पाच जागांमध्ये माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यासह अमल महाडिक, अमरीश पटेल, वसंत खंडेलवाल आणि राजहंस सिंह यांच्या नावाचा समावेश आहे. शिवसेना कोणाला उमदेवादी देणार याबाबत उत्सुकता होती. शिवसेनेने (Shiv Sena) माजी आमदार सुनिल शिंदे (Sunil Shinde) यांना उमेदवारी दिल्याची सूत्रांची माहिती आहे. सुनिल शिंदे यांच्या नावाची आता केवळ अधिकृत घोषणा बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजपकडून कोणाला कोठून उमेदवारी
- नागपूर: चंद्रशेखर बावनकुळे
- कोल्हापूर: अमल महाडिक
- धुळे-नंदुरबार: अमरीश पटेल
- अकोला-बुलडाणा-वाशिम: वसंत खंडेलवाल
- मुंबई: राजहंस सिंह
पाठिमागच्या वेळी विधानपरिषद निवडणुकीत भाजपने अनेक प्रमुख चेहऱ्यांना नाकारले. यात चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे (पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला), विनोद तावडे यांच्यासारख्या अनेक मंडळींचा त्यात समावेश होता. ही सर्व मंडळी नाराज असल्याचीही चर्चा होती. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे हे अनेकदा पक्षाची भूमिका जोरदारपणे माडताना दिसून आले. प्रामुख्याने ओबीसी आरक्षण, वाढीवल विज बील आंदोलन यांसारख्या विविध मुद्द्यांवरुन बावनकुळे यांनी पक्षाच्या वतीने आवज उठवणे कायम ठेवले. त्याची पावती त्यांना मिळाल्याची चर्चा आहे. (हेही वाचा, Maharashtra MLC By-Election 2021: विधानपरिषद निवडणुकीत महाविकासआघाडी समोर आव्हान, भाजपच्या खेळीकडे लक्ष)
कोल्हापूर येथून काँग्रेसकडून सतेज पाटील यांना उमेदवारी मिळणार हे गृहीत धरुन भाजपने अमल महाडीक यांचे नाव निश्चित केले. विधानसभा निवडणुक 2014 मध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अमल महाडीक यांनी भाजपतर्फे काँग्रेस उमेदवार सतेज पाटील यांचा पराभव केला होता. आता विधानपरिषद निवडणुकीत पुन्हा एकदा सतेज पाटील विरुद्ध अमल महाडीक असा सामना रंगणार आहे.
ट्विट
धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने अमरिश पटेल यांना मैदानात उतरवले आहे. भाजपची नावनिश्चीती झाली आहे. मात्र, महाविकासआघाडीकडून मात्र अद्याप तरी कोणाचे नाव जाहीर झाले नाही. त्यामुळे या उमेदवाबाबत उत्सुकता आहे.