Maharashtra 'Mission Begin Again': महाराष्ट्रामधील लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवला; मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये मॉल व मार्केट कॉम्प्लेक्स उघडण्यास परवानगी, जाणून घ्या काय असेल सुरु

त्याद्वारे रात्रीच्या वेळी व्यक्तींच्या हालचालीवरील निर्बंध हटविले गेले आहेत. तसेच योग संस्था (Yoga Institutes) आणि जिम (Gymnasiums) 5 ऑगस्ट 2020 पासून उघडण्यास परवानगी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे । Photo Credits: PTI

आज गृह मंत्रालयाने (MHA) अनलॉक 3 (Unlock 3) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्याद्वारे रात्रीच्या वेळी व्यक्तींच्या हालचालीवरील निर्बंध हटविले गेले आहेत. तसेच योग संस्था (Yoga Institutes) आणि जिम (Gymnasiums) 5 ऑगस्ट 2020 पासून उघडण्यास परवानगी दिली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) राज्यातील लॉक डाऊन (Lockdwon) 31 ऑगस्ट पर्यंत वाढवला आहे. मात्र मार्गदर्शक सूचनांनुसार मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स उघडण्यास 5 ऑगस्टपासून, सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. परंतु, मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समध्ये थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स बंदच राहतील.

मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिकांसह बृहन्मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर याठिकाणी खालील गोष्टी सुरु राहतील.

एएनआय ट्वीट -

अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये ‘मिशन बिगीन अगेन’द्वारे काही गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, आज केंद्राने महत्वाचा निर्णय घेत, 5 ऑगस्ट 2020 पासून सर्व योग संस्था आणि व्यायामशाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मानक ऑपरेटिंग प्रक्रियेचे (SOP) पालन करणे बंधनकारक असेल. मात्र सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, सभागृह, असेंब्ली हॉल आणि अशा सर्व ठिकाणी बंदी असल्याचे सांगितले आहे.