पनवेल येथील इंडिया बुलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये बलात्कार करणाऱ्या आरोपीविरोधात कठोर कारवाई करावी; महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी

याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Yashomati Thakur (Photo Credit: Twitter)

पनवेलमधील (Panvel) इंडिया बुलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये (India Bull's Quarantine Center) बलात्काराची घटना गुरुवारी घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. क्वारंटाइन सेंटरमध्येच हा प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी महाराष्ट्रातील महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनीही आक्रमक भुमिका घेतली आहे. तसेच याप्रकरणातील आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याकडे केली आहे.

पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील कोरोनाबाधित आणि कोरोना संशयितांना इंडिया बुलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात येते. मात्र, या सेंटरमध्ये एका महिलेचा बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणातील आरोपी आणि पीडिता या दोघांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी इंडिया बुलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. दोघेही एकमेकांना ओळखत नसल्याची समजत आहे. या घटनेवर यशोमती ठाकूर यांनी संताप व्यक्त केला आहे. नवी मुंबई येथील कोविड सेंटरमध्ये घडलेला प्रकार अत्यंत दुर्देवी आहे. याप्रकरणातील दोषीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोषीविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत मी गृहमंत्र्यांशी बोलले आहे आणि त्यांना पत्रदेखील लिहले आहे, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. हे देखील वाचा-मुंबई: किरकोळ वादातून रिक्षा चालकाने शेजाऱ्यांच्या 13 वर्षीय मुलाचा खून करत शवाचे तुकडे करून जंगलात पुरले, दोषीला अटक

महाराष्ट्रावर कोरोना विषाणूचे संकट वावरत असताना पनवेल येथील इंडिया बुलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये घडलेल्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. याआधी मनसे नेत्या शालिनी ठाकरे, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली होती.