महाराष्ट्र: लॉकडाउनमुळे स्थलांतरित कामगारांचा  टॅक्सी, ऑटो रिक्षाच्या माध्यमातून मुंबई ते उत्तर प्रदेश प्रवास

तर लॉकडाउनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले असल्याने बहुसंख्य नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. खासकरुन हातावर पोट असणाऱ्यांना याचा अधिक फटका बसला असून त्यांनी उत्पादनाचे कोणतेच साधन उपलब्ध नसल्याने आपल्या घरची वाट पकडली आहे.

Rickshaw And Taxi (Photo Credits: Wikimedia Commons)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने लॉकडाउनचे आदेश कायम राहणार आहेत. तर लॉकडाउनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले असल्याने बहुसंख्य नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. खासकरुन हातावर पोट असणाऱ्यांना याचा अधिक फटका बसला असून त्यांनी उत्पादनाचे कोणतेच साधन उपलब्ध नसल्याने आपल्या घरची वाट पकडली आहे. याच दरम्यान आता मुंबईतील स्थलांतरित कामगार आणि टॅक्सी (Kaali Peeli Taxi), ऑटो रिक्षा (Auto Rickshaw) चालवणारे स्थलांतरित कामगार आता त्याच्या माध्यमातून आपल्या घरी जात असल्याचे सांगण्यात येत आहे. हे जवळजवळ 1000 ते 5000 काळी पिवळी टॅक्सी आणि ऑटो रिक्षामुंबई शहर सोडून जात आहेत.

मुंबई- आगरा महामार्गावर एका सायकलस्वाराने पीटीआय यांनी असे सांगितले की, स्थलांतरित कामगार ट्रक, ऑटो रिक्षा आणि बाईकच्या माध्यमातून आपल्या घरी जात आहेत. केंद्राने असे म्हटले आहे की, कोरोनामुळे लॉकडाउन अधिक काळ वाढू शकतो. त्यामुळेच टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी आपल्या घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत सध्या 45 हदार काळी पिवळी टॅक्सी आणि 5 लाख ऑटो रिक्षा मेट्रोपोलिटन शहरात असल्याचे टॅक्सी युनियनने म्हटले आहे. परंतु लॉकडाउनमुळे म्हणजेच जवळजवळ 2 महिने टॅक्सी आणि रिक्षाचालकांना त्यामधून कोणतेच उत्पन्न मिळालेले नाही. मुंबईत अन्नाशिवाय दिवस काढण्यापेक्षा त्यांनी घरी जाण्याची वाट पकडली आहे.(Lockdown काळात 1 लाखाहून अधिक गुन्हे दाखल; नियम मोडणाऱ्यांकडून 3 कोटींहून अधिक दंडवसुली- अनिल देशमुख)

 रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या युनियन लीडर्सने असे म्हटले आहे की, मुंबईतून 20 ते 50 जणांना ग्रुप किंवा त्यापेक्षा ही अधिक जण हे उत्तर प्रदेशात जाण्यासाठी निघाले आहेत. तसेच बिहार, मध्य प्रदेश, झारखंड येथे सुद्धा काही जण जाणार आहेत. तर काही टॅक्सी कर्नाटक पर्यंत प्रवास करणार आहेत. लॉकडाउनच्या पुढचा टप्पा वाढला तर आम्हाला आमच्या घरी जाण्यासाठी बंधने घातली जातील अशी भीती असल्याने मुंबई सोडून जाण्याचा निर्णय आताच घेतला आहे.(Lockdown काळात नाशिक येथून मध्य प्रदेश मध्ये पायी जात असताना वाटेतच गरोदर महिलेने दिला बाळाला जन्म)

आरटीओ अधिकाऱ्यांनी ज्या ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचालकांकडे ऑनलाईन पद्धतीने काढलेला परवाना असेल तर त्यांना आपल्या घरी जाण्यास परवानगी देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र वाहतूक विभागाकडून ऑफलाईन पद्धतीने परवाना देणे अशक्य आहे कारण त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे ही सांगण्यात आले आहे.