Nagpur Metro Recruitment 2021: नागपूर मेट्रो मध्ये इंजिनिअर्ससाठी नोकरीची संधी; येथे करा अर्ज
इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात.
नागपूर मेट्रो मध्ये ( Nagpur Metro Recruitment 2021) इंजिनियर्ससाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध आहे. यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली असून मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, संयुक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, संयुक्त महाव्यवस्थापक, वरिष्ठ उप महाव्यवस्थापक, वरिष्ठ उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. 28 सप्टेंबर 2021 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने देखील तुम्ही नोकरीसाठी अप्लाय करु शकता. यासाठी https://www.mahametro.org/index.html या वेबसाईटला भेट द्या. यासंदर्भातील अधिकृत नोटीफिकेशन येथे पहा. दरम्यान, या विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, याची माहिती घेऊया...
# संयुक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Joint Chief Project Manager)- सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये BE / B. Tech पूर्ण वेळ पदवी.
# संयुक्त महाव्यवस्थापक (Joint General Manager)- सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये BE / B. Tech पूर्ण वेळ पदवी.
# वरिष्ठ उप महाव्यवस्थापक (Senior Deputy General Manager)- सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये BE / B. Tech पूर्ण वेळ पदवी.
# वरिष्ठ उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Senior Deputy Chief Project Manager)- सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये BE / B. Tech पूर्ण वेळ पदवी.
# उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Deputy Chief Project Manager)- सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये BE / B. Tech पूर्ण वेळ पदवी.
# उप महाव्यवस्थापक (Deputy General Manager)- सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये BE / B. Tech पूर्ण वेळ पदवी.
# व्यवस्थापक (Manager)- सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये BE / B. Tech पूर्ण वेळ पदवी.
# सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)- सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये BE / B. Tech पूर्ण वेळ पदवी.
उमेदवारांनी नोकरीसाठी अर्ज मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर- 440010 या पत्त्यावर पाठवावा.