Maharashtra Heatwave: महाराष्ट्रातील तापमान लवकरच 40 अंश सेल्सियसच्या पुढे जाण्याची शक्यता
मुंबई मध्ये देखील 39.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईचा (Mumbai) पारा चक्क 40 अंश सेल्सियसच्या जवळ पोहोचला होता. मुंबईतल्या सांताक्रूझ हवामान केंद्रावर 39.3 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाब्यातही काल कमाल तापमान 37 अंश सेल्सियसची झाली होती. सध्या राज्यातले वाढते तापमान पाहता महाराष्ट्रातील (Maharashtra) तापमान लवकरच 40 अंश सेल्सियस पार करु शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. फक्त महाराष्ट्र नाही तर या उन्हाच्या तडाख्याचा सामना हा महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या बाजूला असलेले राज्य गोवा (Goa), गुजरात आणि राजस्थानलाही करावे लागू शकते.
मुंबई सोबत महाराष्ट्रातील अनेक शहरांना तापमान वाढीचा फटका हा बसू शकतो. यापुर्वी फेब्रुवारीमध्ये कधी उष्ण लहरीची स्थिती उद्भवत नसे. पंरतू यावेळी फेब्रुवारीमध्ये देखील शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्राच्या रायगड आणइ रत्नागिरी जिल्ह्यात उष्ण लहरींचा अर्लट हवामान विभागाकडून देण्यात आला होता.
मार्चमध्ये ही स्थिती आणखी बिघडली असून वर्धा, वाशिम, गोंदिया, गडचिरोली,नागपूर आणि चंद्रपुरातील तापमान हे 35 अंशाच्या पुढे गेले आहे. मुंबई मध्ये देखील 39.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान सामान्य तापमाना पेक्षा 6 अंशाने जास्त आहे. तसेच या मौसमातील हे सर्वौच्च तापमान आहे. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील या तापमान वाढी वर चिंता व्यक्त केली असून लवकरच यासाठी काहि करण्याची मागणी सरकार कडे केली आहे.