महाराष्ट्र माळी समाज महासंघ 2025-2026 साठी लवकरच नवीन कार्यकारणी जाहीर करणार

माळी समाजातील प्रत्येकाने महाराष्ट्र माळी समाज महासंघात सहभागी होऊन समाजकार्य आणि संघटन मजबूत करण्यासाठी पुढे यावे, असे महासंघातर्फे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र माळी समाज महासंघ  2025-2026 साठी  लवकरच नवीन कार्यकारणी जाहीर करणार
Anil Mahajan

महाराष्ट्र माळी समाज महासंघाची 2025-2026 या कालावधीसाठी नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत प्रदेश कमिटी स्तरावर सध्या विचारविनिमय सुरू असून, राज्यभरात विभागनिहाय बैठका घेऊन समाजकार्याची आवड आणि समाजाच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या व्यक्तींना या महासंघात संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र माळी समाज महासंघ ही राज्यातील सर्वात जुनी आणि माळी समाजाचे अधिकृत व्यासपीठ असलेली संघटना आहे. या संघटनेचे कार्य आणि विचारप्रणाली राज्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी, आमदार, खासदार आणि मंत्रिमंडळापर्यंत परिचित आहे. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10-12 वर्षांपासून संघटनेचे कार्य नियमितपणे आणि जोमाने सुरू आहे. आतापर्यंत राज्यभरात अनेक मेळावे आणि कार्यक्रम यशस्वी झाले असून, आता नव्याने संघटनेचे काम अधिक मजबूत करण्याचा संकल्प घेण्यात आला आहे.

या संघटनेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गाव आणि तालुका पातळीवर मान-सन्मान मिळण्याबरोबरच समाजाचा पाईक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. समाजाच्या हितासाठी कार्यरत असलेल्या या महासंघात सामील होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. समाजकार्यात रुची असणाऱ्या व्यक्तींनी महासंघाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी होऊन राज्यभरातील बैठका आणि कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राजकारणात यशस्वी होण्यासाठी समाजाची पाठबळ असणे महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्तींच्या मागे समाज उभा असतो, त्यांनाच राजकीय पक्षांकडून निवडणुकीचे तिकीट आणि महत्त्वाची पदे मिळतात. त्यामुळे माळी समाजातील प्रत्येकाने महाराष्ट्र माळी समाज महासंघात सहभागी होऊन समाजकार्य आणि संघटन मजबूत करण्यासाठी पुढे यावे, असे महासंघातर्फे सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी महासंघाच्या प्रदेश कमिटीशी (8788964050) संपर्क साधावा.

(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2025 01:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).