महाराष्ट्र माळी समाज महासंघाची राज्यस्तरीय कार्यकारणी बैठक नाशिक शासकीय विश्रामगृह संपन्न

महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री अनिल भाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातून महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रमुख सभासद कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Mali Samaj Federation state level executive meeting

नाशिक शासकीय विश्रामगृह येथे 13 जुलै रविवार रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र माळी समाज महासंघाची राज्यस्तरीय कार्यकारणी बैठक आयोजित करण्यात आली होती. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री अनिल भाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातून महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रमुख सभासद कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला महापुरुषांना दीपप्रज्वलन केले. महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे विश्वस्त धुळे येथील आर.बी.माळी यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्रातून नव्याने माळी महासंघात सामील झालेल्या समाज बांधवांचा ओळख परिचय झाला. महाराष्ट्रातील मागील सर्व कार्यकारणी प्रदेश अध्यक्ष महाजन यांनी बरखास्त केली असल्याचे यावेळी घोषणा केली व नवीन सभासद नोंदणीसाठी आलेले सर्व अर्ज मंजूर करण्यात आले. माळी समाजातील निवडून आलेले सर्व आमदार मंत्री खासदार यांचा अभिनंदनचा ठराव पास करण्यात आला त्या ठरावाची नक्कल विधानसभा अध्यक्ष यांना पाठवण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.

महासंघाचे अध्यक्ष श्री अनिल महाजन यांनी बैठकीत बोलताना सांगितले की आगामी काळात राज्यात माळी समाजाचे राज्यस्तरीय अधिकृत व्यासपीठ असलेले महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवणार संस्थेचे जास्तीत जास्त सभासद सदस्य नोंदणीवर भर देणार चांगलं काम करणाऱ्या लोकांना महासंघामध्ये चांगल्या पदावर नियुक्ती केले जाणार समाजासाठी धडपड करणाऱ्या होतकरू कार्यकर्त्यांना महासंघाकडून मदत होणार तसेच राजकीय क्षेत्रात काम करणारे माळी समाज बांधव यांचे कार्य लक्षात घेता समाज बांधिलकी लक्षात घेता विविध पक्षात असणारे माळी समाजातील कार्यकर्त्यांना नेत्यांना वेळोवेळी समाज हिताचा विचार करून पाठिंबा देन्याचे ठरले.

प्रवीण महाजन यांची महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली तर कांताताई पांढरे यांची विश्वस्त पदी निवड करण्यात आली व खालील विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवड करण्यात आले. भविष्यात महाराष्ट्र माळी समाज महासंघ अतिशय लोकशाही पद्धतीने आणि सामाजिक हिताने पक्ष विहिरीत चालवण्याचे वचनबद्ध आहे असे अध्यक्ष महाजन यांनी सांगितले बैठकीला महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे विश्वस्त हरिचंद्र डोके ,प्रवीण महाजन ,अजय गायकवाड ,महिला कार्याध्यक्ष कांताताई पांढरे,

इत्यादी प्रमुख लोक उपस्थित होते.

अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने एक कॉर्पोरेट लुक मध्ये ही माळी समाजाची बैठक पार पडली यावेळी टोपी रुमाल तसेच प्रवेश पास परिधान करून अतिशय सुंदर असं बैठकीच आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र माळी समाज महासंघाची आजची नाशिक येथे झालेली बैठक बघून राज्यातील माळी समाजामध्ये नवचैतन्य निर्माण झाले व एक चांगला सामाजिक कार्याचा ऊर्जात्मक संदेश राज्यात गेला. शेवटी अजय गायकवाड यांनी आभार मानले व राष्ट्रगीत झाले नंतर बैठकीची सांगता करण्यात आली.

महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या बैठकीत खालील पदाधिकाऱ्यांची निवड - 

सौ कांताबाई पांढरे  (विश्वस्त ) पुणे, प्रवीण महाजन सचिव , महाराष्ट्र माळी समाज महासंघ विश्वस्त बॉडी मनोहर शिवाजी महाले युवक आघाडी जिल्हाध्यक्ष जळगाव, प्रवीण गणपत पाटील जिल्हाध्यक्ष अध्यात्मिक आघाडी नाशिक जिल्हा , उत्तम कचरू कांबळे जिल्हाध्यक्ष संभाजीनगर , त्र्यंबक शामराव महाजन जिल्हाध्यक्ष जळगाव,  संदीप सुधाकर खंडारे जिल्हाध्यक्ष पुणे , अजय नगराज महाले जिल्हा शहर युवक अध्यक्ष नाशिक,  सुभाष उत्तम महाजन जळगाव जिल्हा संघटक, प्रवीण वंजी माळी अमळनेर तालुका अध्यक्ष , सचिन भैय्या राव माळी युवक उपाध्यक्ष जळगाव, लक्ष्मीकांत शेखर निकम नाशिक शहर युवक उपाध्यक्ष, हरिभाऊ सोनवणे कोपरगाव तालुका अध्यक्ष, चंद्रकांत नारायण गायकवाड जिल्हा संघटक नाशिक , बबन दादाजी शेवाळे नाशिक जिल्हा अध्यक्ष उद्योजक आघाडी, नितीन रमेश महाजन जळगाव शहर महानगर प्रमुख , शिवाजी विनायक महाजन युवक अध्यक्ष नाशिक विभागीय, सचिन खलाणे पालघर जिल्हाध्यक्ष युवक आघाडी, राजेंद्र धर्मा महाले धुळे ग्रामीण युवक उपाध्यक्ष जिल्हा, खुशाल रघुनाथ माळी धुळे ग्रामीण जिल्हा संघटक , साहेबराव विठ्ठल माळी जिल्हा संपर्कप्रमुख धुळे , चिंतामण राजाराम महाले धुळे तालुका संघटक, लक्ष्मण शेवाळे कळवण तालुका अध्यक्ष अध्यात्मिक आघाडी, ललित पाटील नाशिक शहर संघटक, प्रकाश हिम्मतराव सोनवणे विभागीय संघटक नाशिक विभागीय.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement