Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
आज जाहीर झालेल्या लॉटरींमध्ये सागरलक्ष्मी चे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. महा. गजलक्ष्मी सोम ची 5 बक्षिसे 10 हजारांची आहेत.
Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी (Sagarlakshmi), महा. गजलक्ष्मी सोम (Maha.Gajalakshmi Mon), गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी (Ganeshlakshmi Bhagyalakshmi), महा. सह्याद्री धनलक्ष्मी (Maha. Sahyadri Dhanalakshmi) लॉटरींची सोडत आज सोमवारी दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी जाहीर होणार आहे. राज्य शासनाकडून प्रत्येक आठवड्याला लॉटरींची सोडत आयोजित करण्यात येते. प्रत्येक महिन्याला 30 लोक लखपती होऊ शकतात. लॉटरी निकाल हा lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दररोज दुपारी 4 वाजून 15 मिनीटांनी जाहीर केला जातो. त्यामुळे जर तुम्ही लॉटरी खेरदी करत असाल तर, या संकेतस्थळावर तुम्ही ती चेक करू शकता.
राज्यात मटका, जुगार ह्या व्यसनांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लॉटरीची 12 एप्रिल 1969 स्थापना केली होती. या लॉटरी सिस्टीममध्ये राज्य शासनाकडून प्रत्येक आठवडयात एकूण 27 सोडती, 4 मासिक सोडती व वर्षाला 6 भव्यतम सोडत केल्या जातात. आज जाहीर झालेल्या लॉटरींमध्ये सागरलक्ष्मी चे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. महा. गजलक्ष्मी सोम ची 5 बक्षिसे 10 हजारांची आहेत. तर उर्वरीत गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी आणि महा. सह्य्याद्री धनलक्ष्मी लॉटरींची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत.
महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल ऑनलाईन कसा पहाल?
lottery.maharashtra.gov.in ओपन करा.
त्यानंतर 'लॉटरी निकाल' या पर्यायावर क्लिक करा.
त्यापुढे 'महाराष्ट्र लॉटरी निकाल' वर क्लिक करा.
यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणेच तुम्ही ज्या लॉटरीचं तिकीट काढलं आहे त्यावर क्लिक करा.
पीडीएफ स्वरूपातील एक फाईल ओपन होईल.
या पीडीएफ फाईल स्वरूपातील निकालामध्ये प्रत्येक लॉटरीच्या विजेत्याचा क्रमांक तुम्हांला पाहता येऊ शकतो.
ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे. त्याशिवाय, लॉटरी अत्यंत कमी गुंतवणुकीतून मोठे बक्षीस जिंकून देते. त्यामधून नागरिक स्वत:ची स्वप्ने साकार करत आहेत. त्याशिवाय, लॉटरी विक्रीतून मिळणा-या महसूलाचा उपयोग राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सरकारकडून केला जातो. यात शिक्षण, आरोग्य सुधारणा, महिला व बाल विकासाचे मजबूतीकरण तसेच कृषि क्षेत्र आदींसाठी या पैशांचा वापर होतो.
(The above story first appeared on LatestLY on Dec 16, 2024 04:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

