महाराष्ट्र राज्य लॉटरी: सागरलक्ष्मी लॉटरी ते सह्याद्री धनलक्ष्मी सोमवारच्या साप्ताहिक सोडतीचे वेळापत्रक, बक्षीस घ्या जाणून

दर सोमवारी महाराष्ट्र राज्य लॉटरीमार्फत चार वेगवेगळ्या साप्ताहिक सोडती काढल्या जातात . सागरलक्ष्मी, सह्याद्री धनलक्ष्मी, गजलक्ष्मी सोम आणि गणेशलक्ष्मी भाग्यशाली. प्रत्येक सोडतीची तिकीट किंमत, बक्षीस रचना आणि एकूण रक्कम वेगवेगळी आहे.

महाराष्ट्र राज्य लॉटरी: सागरलक्ष्मी लॉटरी ते सह्याद्री धनलक्ष्मी सोमवारच्या साप्ताहिक सोडतीचे वेळापत्रक, बक्षीस घ्या जाणून
Maharashtra Rajya Lottery

Maharashtra State Lottery Result Today: महाराष्ट्र राज्यात सरकारमान्य लॉटरी योजना अनेक वर्षांपासून कार्यरत आहे, आणि दर आठवड्याच्या प्रत्येक दिवसासाठी वेगवेगळ्या नावाच्या सोडती काढल्या जातात. सोमवारी सागरलक्ष्मी, सह्याद्री धनलक्ष्मी, गजलक्ष्मी सोम आणि गणेशलक्ष्मी भाग्यशाली या चार लॉटर्‍यांचा समावेश आहे.  या चारही सोडतींची तिकीट किंमत, बक्षीस रचना आणि एकूण तिकीट संख्या वेगवेगळी असल्याने, कमी बजेटपासून ते तुलनेने मोठ्या बक्षिसाच्या आशेपर्यंत, वेगवेगळ्या गरजा असणाऱ्या सहभागींसाठी विविध पर्याय उपलब्ध होतात.

महाराष्ट्र राज्य लॉटरी च्या या सोडतींमध्ये काय फरक आहे

सागरलक्ष्मी ही या चारही सोडतींपैकी सर्वात महाग आहे. तिकीट किंमत 50 रूपये आहे मात्र त्याच वेळी सर्वात मोठे एकल पहिले बक्षिसही याच सोडतीत आहे, म्हणजे ७ लाख रूपये. त्यामुळे सोमवारच्या सोडतींमध्ये ही सर्वात मोठी आणि आकर्षक सोडत मानली जाते.

सह्याद्री धनलक्ष्मी आणि गजलक्ष्मी सोम यांच्या किंमती जवळपास सारख्या आहेत (अनुक्रमे ३० आणि २० रूपये आहे), आणि दोन्हींची बक्षीस रचनाही एकसारखी आहे. पहिले बक्षिस ९०,००० आणि दहा दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे प्रत्येकी ५,००० रूपये आहे.

गणेशलक्ष्मी भाग्यशाली ही सर्वात स्वस्त सोडत आहे, केवळ दहा रूपये प्रति तिकीट, आणि याच सोडतीत सर्वाधिक म्हणजे एकूण १ लाख तिकिटे उपलब्ध आहेत. त्यामुळे तेच ९०,००० रूपयांचे पहिले बक्षिस मोठ्या तिकीट संख्येत विभागले जाते, तर दुसरे बक्षिस तुलनेने कमी म्हणजे १,००० रूपये इतके आहे.

'महाराष्ट्र राज्य लॉटरी' सोडतीचे निकाल कसे तपासावेत?

महाराष्ट्र राज्य लॉटरीचे निकाल सामान्यतः खालील मार्गांनी उपलब्ध होतात:

  • अधिकृत संकेतस्थळ — महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या अधिकृत वेबसाइट  lottery.maharashtra.gov.in वर प्रत्येक सोडतीचे निकाल प्रकाशित केले जातात.
  • वृत्तपत्रे — काही निवडक  स्थानिक मराठी वृत्तपत्रांमध्ये दुसऱ्या दिवशी सोडतीचे निकाल प्रसिद्ध होतात.
  • अधिकृत विक्री केंद्र — तिकीट खरेदी केलेल्या दुकानातही निकालाची यादी उपलब्ध असते.

निकाल तपासताना तिकिटावरील मालिका क्रमांक (सिरीज) आणि तिकीट क्रमांक दोन्ही जुळवून पाहणे आवश्यक आहे, कारण बक्षिस विशिष्ट मालिकेतील विशिष्ट क्रमांकालाच दिले जाते.

(The above story first appeared on LatestLY on Aug 10, 2026 12:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).