Akarshak Pushkaraj Lottery Result: 'महाराष्ट्र राज्य लॉटरी' मध्ये आज 'आकर्षक पुष्पराज लॉटरी' निकाल lottery.maharashtra.gov.in वर होणार जाहीर

सुमारे 11 लाख रूपयांचे पहिले आणि सर्वाधिक रक्कमेचे बक्षीस दर गुरूवारी जिंकण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकजण या 'पुष्पराज लॉटरी'मध्ये आपलं नशीब आजमवत असतात. आज संध्याकाळी या लॉटरीचा निकाल जाहीर केला जाणार आहे

लॉटरी/ प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Getty Images)

Maharashtra Rajya Lottery Result:  महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या (Maharashtra State Lottery) माध्यमातून दर गुरूवारी आकर्षक पुष्पराज लॉटरी (Akarshak Pushkaraj Lottery) जाहीर केली जाते. यात 11 लाख रूपयांचे पहिले बक्षीस दर गुरूवारी दिले जाते. त्यामुळे अनेकजण या 'पुष्पराज लॉटरी'मध्ये आपलं नशीब आजमवत असतात.

आज संध्याकाळी या लॉटरीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे तुम्हीदेखील आज महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या 'आकर्षक पुष्पराज लॉटरीचं' तिकीट काढलं असेल तर पहा तुम्ही का निकाल ऑनलाईन माध्यमातून कसा पाहू शकाल? महाराष्ट्र राज्य लॉटरीचा निकाल ऑनलाईनप्रमाणेच ऑफलाईन माध्यमातून नियमित वर्तमानपत्रामध्येही जाहीर केला जातो. महाराष्ट्र राज्य लॉटरी रिझल्ट lottery.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर pdf फॉरमेट मध्ये जाहीर झाल्यानंतर तुम्ही तो डाऊनलोड करून पाहू शकाल. (हेही वाचा - सरपंचाची निवड जनतेतून नव्हे तर ग्रामपंचायत सदस्यांमधून होणार; ठाकरे सरकारचा निर्णय)

आकर्षक पुष्पराज लॉटरीमध्ये पहिले बक्षीस 7 लाख रूपयांचे आहे. तर त्यानंतर 7000 हजार रूपयांची 9 बक्षिसं जाहीर केली जाते. तर 2000, 1000, 500 आणि 200 रूपयांची प्रत्येकी 6 बक्षीसं जाहीर केली जाणार आहे. तर 100 रूपयांची 600 बक्षीसं जाहीर केली जाणार आहेत.

विजेती रक्कम कशी मिळवाल?

तुम्हांला 'आकर्षक पुष्पराज लॉटरी'मध्ये तुमचा क्रमांक भाग्यवान विजेत्यांमध्ये असल्यास तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता, तसेच Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरून द्यावी लागेल.यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर, Pan Card Number, Adhar Card Number ही माहिती भरणं आवश्यक असते.सोबत 2 Witness त्यांचा पत्ता, मोबाइल नंबर, Pan Card Xerox, Adhar Card Xerox ही कागदपत्र स्वाक्षरी करून देणं आवश्यक आहेत.