Maharashtra Lockdown: राज्यात आजपासून पुन्हा लॉकडाउनचे निर्बंध कठोर, नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होणार
त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Maharashtra Lockdown: राज्यात कोरोनाचा नवा वेरियंट डेल्टा प्लस आणि तिसरी लाट येण्याची शक्यता पाहता आजपासून लॉकडाउनचे निर्बंध पुन्हा एकदा आजपासून कठोर करण्यात येणार आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असे स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई, उपनगर आणि ठाणे येथे लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यातील नियम लागू केले जाणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकारकडून नव्या गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत.(Pune Lockdown: पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाउनचे निर्बंध कठोर, पहा काय सुरु, बंद राहणार)
नव्या गाइडलाइन्सनुसार, 100 पेक्षा अधिक जणांना कोणत्याही कार्यक्रमांसाठी उपस्थितीत राहता येणार नाही आहे. तसेच बांधकामाच्या ठिकाणी सुद्धा फक्त 50 जणांना उपस्थितीत राहण्याची परवानगी असेल. मेळावा किंवा कोणत्याही समारंभासाठी तीन तासांपेक्षा अधिक वेळ दिला जाणार नाही आहे. त्यामुळे जर नियमांचे पालन न केल्यास कारवाई केली जाईल असे ही सांगण्यात आले आहे.
तर एखाद्याकडून वेळोवेळी नियमांचे उल्लंघन केले जात असल्यास त्याच्यावर संपूर्ण कोरोनाची परिस्थिती निवळेपर्यंत बंदी असणार आहे. तीन, चार आणि पाचव्या टप्प्यातील धार्मिक स्थळे ही भाविकांना दर्शनासाठी बंद राहतील. त्याचसोबत लग्नसोहळा किंवा अंतिमसंस्कारासाठी सुद्धा नव्या गाइडलाइन्सनुसार नियमांचे पालन करावे लागणार आहे. पर्यटन स्थळाच्या येथील हॉटेल्सला सुद्धा नियमांचे पालन करावे. जर काही पर्यटनस्थळे ही पाचव्या टप्प्यात येत असतील तर पर्यटकांना ई-पास शिवाय येता येणार नाही आहे. ऐवढेच नाही तर पाचव्या स्तरातील पर्यटकांना एका आठवड्यासाठी आयसोलेशनमध्ये सुद्धा रहावे लागणार आहे.(Delta Plus Variant: मुंबई सह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लेव्हल 3 निर्बंध; पहा काय सुरु आणि बंद?)
तसेच शाळा. कॉलेज किंवा अन्य शैक्षणिक संस्थेचे नियम खासगी ट्रेनिंग इंस्टिट्युट्स आणि स्किल डेव्हलपमेंट सेंटरसाठी लागू असणार आहेत. मात्र कोविड19 च्या संबंधित सेवा, मेडिकल सेवेसंबंधित ट्रेनिंग इंस्टिट्युट्सला किंवा सेंटर्ससाठी हे नियम लागू नसणार आहेत.