विधिमंडळ हिवाळी अधिवेशन: दूध, अन्नपदार्थांमध्ये भेसळ केल्यास थेट जन्मठेप; अजामिनपात्र गुन्हाही होणार दाखल- बापट
या प्रश्नाला बापट यांनी सभागृहात उत्तर दिले. याच अधिवेशनात हा कायदा करण्यात येईल असेही बापट यांनी सभागृहाला सांगितले.
Maharashtra Legislature Winter Session: दूध आणि अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकार कठोर कायदा आणणार असून, या कायद्यात अशा गुन्ह्यांत दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध जन्मठेपेची शिक्षा आणि अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात येणार आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा गुरुवारी (२२ नोव्हेंबर) केली. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरु आहे. या वेळी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सभागृहात बापट बोलत होते.
दूध आणि अन्नात होणाऱ्या भेसळीबाबत काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला बापट यांनी सभागृहात उत्तर दिले. बापट म्हणाले, दूध आणि अन्नपदार्थांच्या भेसळीच्या गुन्ह्यात दोषी आढळणाऱ्यांना यापूर्वी केवळ सहा महिने शिक्षेची तरतुद होती. तसेच, आरोपींना या गुन्ह्यांमध्ये जामीनही लवकर मिळत असे. त्यामुळे गुन्हेगार निर्ढावले आहेत. त्यांना कायद्याचा धाक उरला नव्हता. त्यामुळे हा कायदा अता अधिक कडक करण्यात येणार आहे. तसेच, याच अधिवेशनात हा कायदा करण्यात येईल असेही बापट यांनी सभागृहाला सांगितले. (हेही वाचा, 'हॅलो दोस्तो भैंस का दूध पी लो' व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल)
दूध आणि अन्नपदार्थांमध्ये होत असलेल्या भेसळीबाबत विधानसभा सभागृहात मार्च महिन्यात लक्षवेधी मांडून प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी उत्तर देताना बापट यांनी भेसळ करणाऱ्यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्याबाबत अश्वासन दिले होते. मात्र, बापट यांच्या या उत्तराने समाधानी न होता गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आमदारांनी केली होती.