IPL Auction 2025 Live

Maratha Reservation: मराठा आंदोलकांचा मुंबईत आंदोलनाचा इशारा; पोलिसांकडून अनेक ठिकाणी नाकाबंदी; काही जण ताब्यात

अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण हा मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सरकारवरील दबाव वाढविण्यासाठी राज्यभरातील मराठा आंदोलकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मराठा आरक्षण (संग्रहित प्रतिमा)

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 2020 (Maharashtra Legislature Winter Session 2020) आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्दा पुढे रेठण्यासाठी मराठा समाजातील काही आंदोलकांकडून मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या ईशाऱ्यानंतर महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांकडून अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलीस तातडीने चौकशी करत आहेत. मुंबई शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व सीमांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. सर्व वाहनांची तपासणी करुन आणि नोंदणी करुनच शहरात प्रवेश दिला जात आहे. अनेक ठिकाणी फौजफाटाही वाढविण्यात आला आहे.

दरम्यान, आज (सोमवार, 14 डिसेंबर) सकाळी भगवा झेंडा लावलेली एक बस मुंबई शहरात प्रवेश करत होती. या बसला पोलिसांनी मुलुंड टोलनाका येथेच आडवले. बसमधील प्रवाशांची कसून चौकशी केली. परंतू बसमधील सर्व प्रवाशी हे सरकारी कर्मचारी होते. हे सर्वजण सरकारी कर्मचारी असल्याची माहिती पटल्यानंतरच पोलिसांनी या बसला पुढे प्रवेश दिला. पोलिसांनी या वेळी बसवरील भगवा झेंडा उतरवल्याचीही माहिती आहे.

राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण हा मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सरकारवरील दबाव वाढविण्यासाठी राज्यभरातील मराठा आंदोलकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांना नजरकैदेत ठेवल्याचे समजते आहे.

दरम्यान, पोलिसांनी नाकाबंदी केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर 4-4 किलोमीटरच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा मुख्यालय अतिरिक्त पोलीस दल , महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली व खलापूर पोलीस, जिल्हा वाहतूक पोलीस खालापूर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणावर फौजफाटा पाहायला मिळत आहे.