Maharashtra: दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा यांना काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या एका जागेसाठी उमेदवारी जाहीर

प्रज्ञा सातव ( Pradnya Satav) यांना विधानपरिषदेच्या एका जागेसाठी उमेदवारी दिली गेली आहे. याबद्दल काँग्रेसने ट्विट करत माहिती दिली आहे.

Pradnya Satav (Photo Credits-Facebook)

दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव (Rajeev Satav) यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांना विधानपरिषदेच्या एका जागेसाठी उमेदवारी दिली गेली आहे. याबद्दल काँग्रेसने ट्विट करत माहिती दिली आहे. तर भाजप कडून याच जागेसाठी भाजप अध्यक्ष संजय किणेकर हे अर्ज दाखल करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. येत्या 2024 पर्यंत या विधानपरिषदेचा कालावधी असणार आहे. राजीव सातव यांचे निधन झाल्यानंतर त्यांची पत्नी प्रज्ञा यांना राज्यसभेचे तिकिट दिले जाईल अशी जोरदार चर्चा होती पण तसे झाले नाही. त्यावेळी त्यांना विधानपरिषदेची तिकिट दिली जाईल असे आश्वासन दिले गले. पण काही दिवसांपू्र्वीच काँग्रेस नेते शरद रणपिसे यांचे निधन झाल्यानंतर त्यांची जागा रिक्त राहिल्याने आता प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेचे तिकिट दिले आहे.

महाराष्ट्र काँग्रेसेने ट्विट करत असे म्हटले की, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्री. सोनिया गांधी यांनी आमदारांद्वारे निवडल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची पोटनिवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून डॉ (श्रीमती) प्रज्ञा राजीव सातव यांच्या उमेदवारीच्या प्रस्तावाला सोनिया गांधी यांनी मंजुरी दिली आहे.(Most Vegan Friendly City Award: मुंबईला मोस्ट व्हेगन-फ्रेंडली सिटी पुरस्कार देण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षाचे नगरसेवक नाराज, पुरस्कार परत करण्याची केली मागणी)

Tweet:

दरम्यान, शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार यासाठी अनेकजण स्पर्धेत होते. तर काँग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरे यांचे सुद्धा नाव आघाडीवर होते. परंतु काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेचे तिकिट देणार असल्याचा शब्द पाळला गेला.