Maharashtra Assembly Winter Session: मराठा आरक्षण प्रश्नी चर्चा न झाल्याने विधानपरिषदेत भाजपा आमदारांचा सभात्याग; कामकाज तहकूब

मात्र विधानपरिषदेमध्ये या विषयावर चर्चा होऊ न दिल्याचं सांगत सरकार रेटून काम करत आहेत असा दावा केला आहे.

Pravin Darekar | Photo Credits: Twitter/ ANI

महाराष्ट्र विधिमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज दुसर्‍या आणि अंतिम दिवशी विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न आला आहे. दरम्यान विधानपरिषदेमध्ये यावर चर्चा न झाल्याने भाजपा आमदारांनी सभात्याग केला आहे. यामुळे विधान परिषदेचं काम तहकूब झालं आहे. तर विधानसभेमध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडताना मराठा समाजाला इतर समाजामध्ये वाटून आरक्षण देऊ नका. तसे झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

दरम्यान आज विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे लक्ष्य वेधण्यासाठी आमदार विनायक मेटे काळे कपडे घालून आले होते. मात्र विधानपरिषदेमध्ये या विषयावर चर्चा होऊ न दिल्याचं सांगत सरकार रेटून काम करत आहेत असा दावा केला आहे. यानंतर चर्चेची मागणी पूर्ण न झाल्याने भाजपाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी भाजपा सभात्याग करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ANI Tweet

विधानपरिषदेमध्ये चर्चा झाली नसली तरीही विधानभवनामध्ये मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण प्रश्नावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळेस त्यांनी सरकारने सर्वोच्च न्यायालयात आपण नोकरभरती थांबवल्याचं सांगून चूक केली आणि त्याचा परिणाम म्हणून मराठा आरक्षणावर स्थगिती आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच मराठा समाजाला आंदोलन करायला देत नाहीत, घरीच थांबवलं जातं हे चूकीचं असल्याचं म्हटलं आहे. तसेच हे आरक्षण देताना इतर समाजात ते वाटून देण्याचाही सरकारने घाट घालू नये असं म्हटलं आहे. तशी तरतूद तातडीने करावी असे देखील ते म्हणाले. Devendra Fadnavis on Shakti Act: शक्ती कायद्याचा निर्णय सरकारने घाईने घेतल्यास तो प्रभावी ठरणार नाही- देवेंद्र फडणवीस.

सर्वोच्च न्यायालयात सध्या मराठा आरक्षण स्थगिती उठवावी यासाठी दाद मागितली जात आहे. येत्या 25 जानेवारी पासून त्यावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. या स्थगितीमुळे यंदाच्या वर्षात शिक्षण आणि नोकरभरतीमध्ये मराठा आरक्षण लागू न करण्याचे आदेश आहे.