Maharashtra Kesari Kusti 2019-20: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर; येथे पाहा संपूर्ण यादी
महाराष्ट्र केसरी कुस्ती 2020 ला 2 जानेवारीपासून सुरुवात झाली असून 7 जानेवारीपर्यंत हा सामना रंगणार आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती 2020 ला 2 जानेवारीपासून सुरुवात झाली असून 7 जानेवारीपर्यंत हा सामना रंगणार आहे. पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात (Shivchatrapati Krida Sankul) ही स्पर्धा रंगत आहे. ही स्पर्धा दहा वजनी गटात होणार असून यामध्ये प्रत्येक गटात माती आणि मॅट अशी वर्गवारी केली जाणार आहे. महाराष्ट्राचा पारंपारिक खेळ समजल्या जाणा-या कुस्तीला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात मुंबई, सातारा, बुलढाणा, नाशिक सारख्या अन्य जिल्ह्यांतील पैलवानांनी बाजी मारली आहे.
मामासाहेब मोहोळ यांच्याकडून 1961 पासून या कुस्ती स्पर्धेची सुरुवात करण्यात आली होती . मात्र कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मामासाहेब मोहोळ यांचे 1982 साली निधन झाल्यानंतर ही परंपरा मोहोळ कुटुंबीयांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला सुपूर्द केली. गेली 36 वर्ष मोहोळ कुटुंबीयांकडून 'महाराष्ट्र केसरी' विजेत्यासाठी चांदीची गदा बनवून देण्यात येते.महाराष्ट्र केसरीच्या विजेत्याला चांदीची गदा आणि 2 लाख रुपयाचं रोख बक्षीस दिले जात असल्याने ही स्पर्धा अत्यंत चर्चेची ठरते.
येथे पाहा पहिल्या फेरीची यादी
मागील वर्षी या स्पर्धेचा अंतिम खेळ हा जालना येथे रंगला होता, ज्यामध्ये बाला रफिक शेख यांनी 2018 च्या 'महाराष्ट्र केसरी'चा मान पटकावला होता. या स्पर्धेत राज्यभरातून अनेक मातब्बर कुस्तीपटू सहभागी होत असतात त्यामुळे ही मानाची कोण जिंकणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून असते.