Maharashtra Kesari 2020: हर्षवर्धन सदगीर ठरला यंदाचा 'महाराष्ट्र केसरी'; राजकारणी नेत्यांनी केले अभिनंदन, पहा ट्वीट्स
या पार्श्वभूमीवर हर्षवर्धनवर चहूकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही सोशल मिडीयाच्या माध्यमातून हर्षवर्धनचे कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
यावर्षीचा महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) हा किताब हर्षवर्धन सदगीर (Harshvardhan Sadgir) या मल्लाने पटकाविला आहे. हर्षवर्धनने पुण्याच्या काका पवार तालमीत (Kaka Pawar Talim) कुस्तीचे धडे घेतले होते. महत्वाचे म्हणजे आजची अंतिम लढत ही, लातूरच्या शैलेश शेळके आणि नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर या काका पवारांच्याच दोन्ही पठ्ठ्यांमध्ये पाहायला मिळाली. मात्र हर्षवर्धनने शैलेशचा 2-3 असा पराभव करत 63 व्या ‘महाराष्ट्र केसरी 2020' ही मानाची गदा पटकावली. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धनवर चहूकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही सोशल मिडीयाच्या माध्यमातून हर्षवर्धनचे कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील अंतिम सामना पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल (Shree Shiv Chhatrapati Krida Sankul, Balewadi) बालेवाडी येथे पार पडला. यामध्ये गतवर्षीचा विजेता बाला रफिक शेख आणि उपविजेता अभिजीत कटके या दोघांचाही पराभव करत, हर्षवर्धन सदगीर ठरला यंदाचा 'महाराष्ट्र केसरी' तर शैलेश शेळके ठरला उपविजेता. (हेही वाचा: Maharashtra Kesari Winner 2020: हर्षवर्धन सदगीर यंदाचा 'महाराष्ट्र केसरी', शैलेश शेळके उपविजेता; पुणे येथील काका पवार तालमीकडे चांदीची गदा)
दरम्यान, हर्षवर्धन सदगीर हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील आहे. याआधी कित्येक वर्षे त्याने नाशिक जिल्ह्याकडून महाराष्ट्र केसरीचे प्रतिनिधित्व केले आहे. हर्षवर्धनचे आजोबाही नामांकित पैलवान होते. गेले पाच वर्षे तो पाच वर्षांपासून काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लविद्येचे धडे गिरवत आहे.