Arnab Goswami Arrest Case: रायगड SP ना MHRC कडून नोटीस; Material Records घेऊन उद्या 11 वाजता हजर राहण्याचे आदेश
दरम्यान त्यांना उद्या (6 नोव्हेंबर) दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत MHRC कार्यालयामध्ये दाखल होण्याचे आदेश दिले आहेत.
अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणी पोलिसांच्या अटकेमध्ये असलेल्या अर्णब गोस्वामी यांच्या प्रकरणामध्ये आता एक मोठी घडामोड समोर आली आहे. दरम्यान काल (4 नोव्हेंबर) मुंबईच्या राहत्या घरामधून पत्रकार अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना अलिबाग पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता रायगड पोलिस एसपींना (SP Raigad) महाराष्ट्र मानव अधिकार आयोगाकडून (Maharashtra Human Rights Commission) नोटीस बजावत आली आहे. दरम्यान त्यांना उद्या (6 नोव्हेंबर) दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत MHRC कार्यालयामध्ये दाखल होण्याचे आदेश दिले आहेत. यावेळेस त्यांना सारे मटेरियल रिकॉर्ड्स सोबत आणण्याचे देखील आदेश आहेत.
काल सकाळी 8 च्या सुमारास मुंबईमध्ये अलिबाग पोलिस अर्णबच्या घरी दाखल झाले. त्यांनी अर्णब गोस्वामींना पोलिसांना सहकार्य करण्यास सांगितले. मात्र पोलिस आणि गोस्वामी कुटुंबांमध्ये काही काळ बोलणी झाल्यानंतर अर्णब यांना हाताला पकडून पोलिसांनी ताब्यात घेतले आणि अटक केली. सुरूवातीला एन एम जोशी मार्ग पोलिस स्टेशन आणि नंतर अलिबाग पोलिस स्टेशनमध्ये रवानगी करण्यात आली. काल कोर्टात हजर केल्यानंतर अर्णबला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. आता मुंबई उच्च न्यायालयात जामीनावर सुनावणी सुरू आहे.
दरम्यान मोबाईल व्हॅनमधून जाताना अर्णब गोस्वामी यांनी वारंवार पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसेच विना चप्पल/ शूज घेऊन आल्याचेही मीडिया कॅमेर्यासमोर म्हटलं आहे. Anil Deshmukh On Arnab Goswami Arrest: कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही; पोलिसांची कारवाई कायद्यानेच - महाराष्ट्र गृहमंत्री अनिल देशमुख.
अर्णब गोस्वामी हे पत्रकार असून 'रिपब्लिक चॅनेलचे' एडिटर इन चीफ व मालक आहेत. त्यांच्या अटकेनंतर देशभरातून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. भाजपाने या अटकेची तुलना आणिबाणीच्या परिस्थितीशी केली आहे.