Maharashtra HSC And SSC Result 2020 Date: दहावी आणि बारावीचा निकाल 'या' दिवशी होणार जाहीर
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात शाळा, महाविद्यालय, उद्योगधंदे, व्यवसाय, वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, राज्यात 3 जूनपासून लॉकडाउनच्या काही नियमांना शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात शाळा, महाविद्यालय, उद्योगधंदे, व्यवसाय, वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, राज्यात 3 जूनपासून लॉकडाउनच्या काही नियमांना शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीचा निकाल (HSC And SSC Result 2020 Date) कधीलागणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही पडला होता. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी (Varsha Gaikawad) अशा प्रश्नांवर पूर्णविराम लावला आहे. येत्या 15 जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, सोमवारी शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल पद्धतीने शाळा सुरु करण्यात येणार आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या तसंच ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागासोबत बैठक पार पडली. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड बैठकीत उपस्थित होत्या. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आज वर्षा गायकवाड यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना सांगितले की, “पेपर अडकून पडले असल्याने यावर्षी आपला निकाल उशीर येतोय. 15 जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलै महिन्याच्या अखेपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरुन ऑगस्टमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन सप्टेंबरपासून अकरावीचे वर्ग सुरु करता येतील. त्यादृष्टीने आम्ही जास्त मेहनत करत आहोत. लवकरात लवकर करता येईल या यासाठीही प्रयत्न सुरु आहेत, असेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- MMRDA Recruitment 2020: गवंडी, वेल्डर, इलेक्ट्रिशन, फीटर ते अकुशल कामगारांना एमएमआरडीए मध्ये पायाभूत प्रकल्पांमध्ये 16726 रोजगाराच्या संधी उपलब्ध; mmrda.maharashtra.gov.in नोटिफिकेशन जारी, इथे करा संपर्क
कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. कोरोनामुळे राज्यातील काही भागात ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मान्यता दिली आहे. ज्यामुळे पालकांना तात्पूर्ता दिलासा मिळाला आहे.