Maharashtra HSC Exam 2021: इयत्ता बारावी परीक्षा सुरु होण्याच्या आदल्या दिवसापर्यंतही विद्यार्थी करु शकतात अर्ज

प्रतिदिन कोरोना संक्रमितांचे आकडे लाखोंच्या घरात पाहायला मिळत आहे. यात महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या प्रचंड मोठ्या आहे. त्यामुळे राज्य सरकार कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. या उपाययोजनांचाच एक भाग म्हणून सरकारने यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.

Exam | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सावध पावले टाकत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यंदा इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा (Maharashtra SSC Exam) रद्द केली. इयत्ता बारावीच्या परीक्षेबाबत मात्र असा निर्णय न घेता या परीक्षा (Maharashtra HSC Exam 2021) होणारच अशी भूमिका राज्य सरकारने घेतली. त्यामुळे यंदाही इयत्ता बारावीच्या परीक्षा पार पडणार आहेत. परंतू, कोरोना स्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी बोर्ड परीक्षा सुरु होण्याच्या आदल्या दिवसापर्यंतही विद्यार्थांना परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे.

इयत्ता बारावी परीक्षेबाबत बोलताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले होते की, इयत्ता बारावी हा कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. परंतू, सध्या असलेले कोरोना व्हायरसचे संकट पाहता ही परीक्षा कशी द्यायची हा प्रश्न केवळ विद्यार्थीच नव्हे तर त्यांचे पालक आणि संबंधित संस्थांसमोरही आहे. त्यामुळेच या वेळी इयत्ता बारावी पक्षीक्षा मे महिन्यापर्यंत पुढे ढकलणयाचा निर्णय आम्ही घेत आहोत. बारावीची परीक्षा आता मे महिन्याच्या अखेरीस घेतली जाईल, असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले होते. इतर शिक्षण मंडळांनीही असाच निर्णय घ्यावा, असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले होते.

दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती देताना इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा रद्द झाल्याबाबत माहिती दिली होती. ही माहिती देतानाच इयत्ता बारावीची परीक्षा मात्र होणार असल्याचे टोपे म्हणाले होते. (हेही वाचा: MBBS Exam: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आता जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार एमबीबीएसची परीक्षा; अमित देशमुख यांची माहिती).

देशभरात कोरोना व्हायरस संसर्ग मोठ्या झपाट्याने वाढतो आहे. प्रतिदिन कोरोना संक्रमितांचे आकडे लाखोंच्या घरात पाहायला मिळत आहे. यात महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या प्रचंड मोठ्या आहे. त्यामुळे राज्य सरकार कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. या उपाययोजनांचाच एक भाग म्हणून सरकारने यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.