Maharashtra HSC Exam 2021: 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनासंदर्भात वर्षा गायकवाड यांची महत्त्वपूर्ण माहिती

या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

Varsha Gaikwad (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 12 वी बोर्डाच्या (HSC Board) परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने हा निर्णय जाहीर केला. त्यानंतर आता बारावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत. या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. (राज्यातील कोरोनाची सद्य स्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 12 वीच्या परीक्षा रद्द- वर्षा गायकवाड)

वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे सांगितले की, "शुक्रवारी संध्याकाळी राज्य सरकारकडून बारावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतल्याचा शासकीय आदेश काढण्यात आला. लवकरच अंतर्गत मूल्यमापनाचे निकष राज्य मंडळामार्फत जाहीर करण्यात येतील." (Maharashtra SSC Exam Results 2021: अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना वैकल्पिक सीईटी द्यावी लागणार- शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड)

वर्षा गायकवाड ट्विट:

सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारी एचएससी बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेचा विचार करता रद्द करण्यात येत आहे. बारावीच्या परीक्षेसाठी पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अंतर्गत मुल्यांकन केले जावे. अंतर्गत मुल्यमापन निकष आणि गुणपत्रक यांचे वितरण यासंदर्भात स्वतंत्र निर्देश देण्यात येतील, असे ट्विटरवर शेअर केलेल्या शासकीय आदेशात म्हटले आहे. दरम्यान, हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी बोर्डाच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. 10 वीच्या विद्यार्थ्यांना देखील अंतर्गत मूल्यांकनानुसार गुण देण्यात येणार आहेत.