महाराष्ट्र: Lockdown काळात वाईन शॉप वरील बंदी बाबत राजेश टोपे यांच्या 'या' विधानामुळे मद्यप्रेमींच्या आशा झाल्या पल्लवित
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने दारूच्या दुकानावरील बंदीबाबत विचारले असता त्यांनी दिलेले उत्तर ऐकून मद्यप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशभरात 3 मे लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. मात्र देशाचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून केंद्र सरकारने 20 काही गोष्टींवर निर्बंध उठविले असून नवीन नियमावली तयार केली आहे. यात जीवनाश्यक वस्तू वगळता सर्व गोष्टींवर बंधनं आली असल्याने हॉटेल, बार आणि दारुची दुकाने बंद आहेत. यामुळे काल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांना पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने दारूच्या दुकानावरील बंदीबाबत विचारले असता त्यांनी दिलेले उत्तर ऐकून मद्यप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
राजेश टोपे यांच्या फेसबुक लाईव्ह दरम्यान एकाने त्यांना दारु दुकानाच्या बंदीबाबत विचारले असता “जर सोशल डिस्टन्सिंच्या नियमांचं योग्य पालन केलं तर दारुच्या दुकांनावर कोणतीही बंदी असणार नाही” असे उत्तर दिले.Coronavirus in Mumbai: 155 नव्या रुग्णांसह मुंबईत कोरोना बाधितांची एकूण संख्या 3090 वर
हे उत्तर जरी मद्यप्रेमींसाठी चांगली बातमी असली तरीही ही दुकाने कधी सुरु होतील याबाबत कोणतीही माहिती राजेश टोपे यांनी दिलेली नाही.
मद्य उत्पादक क्षेत्रालाही लॉकडाउनचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सीआयएबीसी (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेवरेज कंपनीज् ) या संघटनेनं महाराष्ट्रात ऑनलाईन मद्य विक्री करण्यास परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. यासंदर्भात संघटनेनं मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं.
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या असलेल्या मुंबईत 155 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून येथील रुग्णांची संख्या 3090 जाऊन पोहोचली आहे. तर पुण्यात कोविड-19 चे 65 नवे रुग्ण समोर आले असून या जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 734 झाली आहे.