Maharashtra Gram Panchayat Election 2023 Result: राज्यात ग्रामपंचायत निवडणूकीत महायुतीला घवघवीत यश; एकट्या BJP ने जिंकल्या महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा

ग्राम पंचायत निवडणुकीच्या मतमोजणीनंतर राज्यातील ग्रामीण मतदार काँग्रेस-उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या ‘महाविकास आघाडी’सोबत आहेत की भाजप-एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या महायुतीसोबत आहेत याचा काही प्रमाणात अंदाज आला. निकालांनुसार, महायुतीने 1372 जागा जिंकून आपला वरचष्मा कायम ठेवला आहे.

भाजप (संग्रहित प्रतिमा)

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आणि महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरल्यानंतर रविवारी राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायती आणि 130 सरपंच पदांसाठी मतदान (Gram Panchayat Election) झाले. सोमवारी म्हणजेच आज त्यांची मतमोजणी पूर्ण झाली. या मतमोजणीनंतर राज्यातील ग्रामीण मतदार काँग्रेस-उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या ‘महाविकास आघाडी’सोबत आहेत की भाजप-एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या महायुतीसोबत आहेत याचा काही प्रमाणात अंदाज आला. निकालांनुसार, महायुतीने 1372 जागा जिंकून आपला वरचष्मा कायम ठेवला आहे.

राज्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आघाडीचा पक्ष म्हणून उदयास आला आहे, ज्याने 717 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपसह त्यांचे मित्रपक्ष, शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट, यांनीही अनुक्रमे 273 आणि 382 जागा मिळवल्या आहेत. अशाप्रकारे तीन पक्षांनी मिळून 1372 जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीला 638 ठिकाणी विजय मिळाला आहे.

निकालानुसार, काँग्रेसला 293, राष्ट्रवादी काँग्रेस 205 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 140 ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. याशिवाय, इतरांना 349 जागा मिळाल्या आहेत. यात भाजपाने क्रमांक एकचा पक्ष ठरला असून त्याने महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये एकूण 2359 ग्रामपंचायतींचा समावेश होता आणि 74% मतदान झाले.

महत्वाचे म्हणजे बारामतीमध्ये अजित पवार गटाने दणदणीत विजय मिळवत 31 पैकी 29 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली आहे. इतर दोन जागा भाजपच्या उमेदवारांनी जिंकल्या. राज्यात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात होती.  विजयावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकासात्मक प्रकल्प हाती घेतल्याने सत्ताधारी सरकारला मतदारांचा जबरदस्त जनादेश मिळाला आहे. हे प्रकल्प पूर्वीच्या एमव्हीए सरकारने (उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली) थांबवले होते. शिवाय, बाळासाहेब ठाकरेंच्या आदर्शांशी गद्दारी करणाऱ्यांना जनतेने नाकारले आहे.' (हेही वाचा: Air Pollution in Mumbai: मुंबईमध्ये दिवाळीत संध्याकाळी 7-10 या वेळेतच फटाके फोडण्यास परवानगी; मुंबई उच्च न्यायालयाचे वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्देश)

भाजपच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचितांचे अभिनंदन केले आहे. याबबत केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डाजी यांच्या मार्गदर्शनात भाजपाची संपूर्ण देशात यशस्वी घौडदौड सुरू आहे. ‘पंचायत टू पार्लमेंट’ केवळ आणि केवळ आणि चप्पा-चप्पा भाजपा आहे. राज्यातील महायुती सरकारच्या कामगिरीला सुद्धा हा राज्यातील जनतेने दिलेला सुस्पष्ट कौल आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा मोठे यश या निवडणुकीत मिळाले. या विजयासाठी अहोरात्र परिश्रम करणार्‍या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. सतत प्रवास करणारे आणि कार्यकर्त्यांना प्रेरित करणारे आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही अभिनंदन! ठिकठिकाणचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांचेही अभिनंदन. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांचेही मी हार्दिक अभिनंदन करतो.’

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now