COVID19: कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी खाजगी रुग्णवाहिका अधिग्रहीत करण्याचा जिल्हा प्रशासनाने घेतला निर्णय

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी वाहन उपलब्ध होत तक्रारी येत आहेत.

Rajesh Tope (Photo Credit: Twitter)

देशात सर्वाधिक कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून आले आहेत. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी वाहन उपलब्ध होत तक्रारी येत आहेत. तसेच रुग्णांना रुग्णालय गाठण्यासाठी कित्येक तास ताटकळत राहावे लागत आहे. हा प्रकार जिल्हा प्रशासनाच्या (District Administration) लक्षात आल्यानंतर त्यांनी खाजगी रुग्णवाहिका तसेच खाजगी वाहने अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या अधीग्रहीत केलेल्या रुग्णवाहिका आणि वाहने 24 तास उपलब्ध राहतील. तसेच रुग्णवाहिका अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त राबवतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णवाहिका रुग्णाकडून अधिक पैसे उकळत असल्याचे तक्रारी येत होत्या. यामुळे जिल्हा प्रशासनान याची दखल घेऊन खासगी रुग्णवाहिका आणि वाहने अधीग्रहीत करताना त्यांचा दर निश्चित करून ते उपलब्ध करून देण्यात यावे. प्रादेशिक परिवहन प्राधीकरणाने ठरवून दिलेल्या दरानुसार भाडे तत्वावरील वाहनांचे दर निश्चित करावे. तसेच त्यासाठी वाहनाचे भाडे, प्रत्यक्ष प्रवासाचे अंतराचा विचार करण्यात यावा, असे या शासन निर्णयात म्हटले आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये कोविड 19 मुळे आत्तापर्यंत 60 जणांचा मृत्यू; 38 मुंंबई पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश

राजेश टोपे यांचे ट्विट-

महाराष्ट्रात आज तब्बल 5 हजार 537 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 80 हजार 298 वर पोहचली आहे. यापैकी 8 हजार 53 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 93 हजार 154 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. ज्यामुळे राज्यातील नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळत आहे.