Free Blood: महाराष्ट्रात आजपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार

राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागात एकूण 34 रक्त पेढ्या कार्यरत आहेत.

Rajesh Tope (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने 12 डिसेंबरपासून सर्व राज्य शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांना मोफत रक्त पुरवण्याची सुविधा राबविण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. सध्या देशात उद्धवलेल्या कोविड 19 महामारीमुळे सर्वसामान्य जनता आणि रुग्णांची गरज व सोय लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वैद्यकीय महाविद्यालय सलंग्न शासकीय रुग्णालयांमध्ये भरती असणाऱ्या रुग्णांना पक्तफेढीतील रक्त पिशव्या व रक्त घटक मोफत उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने हा निर्णय घेतला आहे.

राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागात एकूण 34 रक्त पेढ्या कार्यरत आहेत. या रक्तपेढ्यांमार्फत प्रतिवर्षी सुमारे 1.5 लक्ष रक्त पिशव्या संकलित करुन गरजू रुग्णांना पुरवठा करण्यात येतो. या संदर्भात शासनाने दिनांक 27 एप्रिल 2015 च्या परिपत्रकानुसार रक्त पिशव्यांसाठी सेवा शुल्क दर निश्चित करण्यात आलेले आहेत. हे देखील वाचा- Maharashtra Gram Panchayat Election 2021: राज्यातील 34 जिल्ह्यांत 14,234 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान, 18 तारखेला मतमोजणी

एएनआयचे ट्वीट-

वर्ष 2020-21 साठी सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वैद्यकीय महाविद्यालयात सलंग्न शासकीय रुग्णालयात भरती असणाऱ्या रुग्णांवर रक्तपेढीतील रक्त पिशव्या व रक्त घटक मोफत उपलब्ध करुन देण्यात येतील, याबाबीवर होणारा खर्च हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सन 2020-21 च्या प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यामध्ये या बाबीसाठी झालेल्या निधीमधून भागविण्यात यावा, सदर तात्काळ अंमलात येतील, अशी माहिती राज्य शासनाच्या संकेत स्थळावर देण्यात आली आहे.