महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 41 हजार बस मधुन 5 लाखाहुन अधिक परराज्यातील नागरिकांची मुळगावी रवानगी, महाराष्ट्र सरकारने केला 94.66 कोटी खर्च

या माध्यमातून आतापर्यंत 5 लाख 8 हजार 803 स्थलांतरीतांना त्यांच्या मुळगावी पाठवण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने 100 टक्के निधी दिला असुन एकुण 94 कोटी खर्च झाला आहे.

Image For Representation (Photo Credits: File Image)

महाराष्ट्रात (Maharashtra) अडकून पडलेल्या परराज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्यात सुखरूप परत जाता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 29 मे 2020 पर्यंत 41 हजार 874 बस चालवल्या होत्या. या माध्यमातून आतापर्यंत 5 लाख 8 हजार 803 स्थलांतरीतांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत/नजीकच्या रेल्वे स्टेशन्स पर्यंत नेऊन सोडण्यात आले आहे.परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत बसने पाठवण्यासाठी शासनाने 100 टक्के निधी उपलब्ध करून दिला असून आतापर्यंत 94.66 कोटी रुपये यावर खर्च झाले आहेत. अशी माहिती महाराष्ट्र सरकारच्या वतीने ट्विटरच्या माध्यमातुन देण्यात आली आहे. Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे सह तुम्ही राहात असणाऱ्या कोरोनाचे रुग्ण आहेत? पहा आजची कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

हिंदुस्तान टाईम्स च्या माहितीनुसार, 1 मे पासून आजवर 800 श्रमिक स्पेशल गाडया महाराष्ट्रातुन सुटल्या आहेत, याही माध्यमातुन महाराष्ट्र सरकार ने राज्यात अडकलेल्या सुमारे 11.5 लाख कामगारांना त्यांच्या मूळ राज्यात परत पाठविले आहे. आता राज्यात कमी स्थलांतरित नागरिक शिल्ल्क आहेत. अनेक सेवाभावी संस्था तसेच सेलिब्रिटींच्या मदतीने सुद्धा हे काम केले जातेय. सोनू सूद ने सांगितली कामगारांना घरी पाठवण्याच्या कामातील खर्चाची रक्कम; एका बस साठी लागतात 'इतके' लाख

पहा ट्विट

दरम्यान , वंदे भारत मिशन अंतर्गत महाराष्ट्रात 26 फ्लाईटसच्या माध्यमातून 3459 नागरिक परत आले आहेत.यात मुंबईतील प्रवाशांची संख्या 1137 आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 1572 असून इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 750 इतकी आहे, तसेच 7 जून 2020 पर्यंत आणखी सहा फ्लाईटस येणे अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचे वाढते आकडे पाहता या परतणार्‍या सर्व प्रवाशांची काटेकोरपणे तपासणी केली जातेय.