Stipend for Maharashtra Students: 'लाडकी बहीण' नंतर आता विद्यार्थ्यांसाठी खास योजना; दरमहा 8 आणि 10 हजार रुपये स्टायफंड, घ्या जाणून

इयत्ता 12 वी पास विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये आणि डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आठ हजार रुपये इतकेच नव्हे तर पदवीधर तरुणांसाठी तब्बल 10,000 हजार रुपये स्टायपंड (Stipend for Maharashtra Students) दरमहा देण्याची घोषणा (Maharashtra Government Scheme for Students) मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Stipend for Students | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

CM Eknath Shinde Scheme For Youth: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) जाहीर केल्यानंतर राज्यातील भावांनी काय घोडे मारले? असा सवाल राज्य सरकारला केला जात आहे. यावर उतारा म्हणून राज्य सरकारने विद्यार्थ्यांना खूश करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे इयत्ता 12 वी पास विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये आणि डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आठ हजार रुपये इतकेच नव्हे तर पदवीधर तरुणांसाठी तब्बल 10,000 हजार रुपये स्टायपंड (Stipend for Maharashtra Students) दरमहा देण्याची घोषणा (Maharashtra Government Scheme for Students) मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लवकरच या योजनेची अंमलबजावणी केली जाईल, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून घोषणेचा पुनरुच्चार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा आज (17 जुलै) रोजी पार पडली. या पुजेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या घोषणेचा पुनरुच्चार केला. मुख्यमंत्र्यांनी महापूजेच्या पूर्वसंध्येलाच ही घोषणा केली होती. दरम्यान, आज त्यांनी याबाबत पुन्हा एकदा भाष्य केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी शासकीय महापूजेनंतर पंढरपूर येथे आयोजित ‘कृषी पंढरी’ या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं आणि नव्या योजनेची घोषणाही केली. (हेही वाचा, Ladka Bhau Yojana: राज्यात लाडकी बहिण योजनेनंतर 'लाडका भाऊ योजना'; सुशिक्षित बेरोजगारांना मिळणार 10 हजारांपर्यंत स्टायपेंड)

'महिलांना प्रति महिना 1500 रुपये'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीप्रमाणेच पंढरपूर येथेही सांगितले की, आमचं सरकार हे शेतकरी, कष्टकरी, वारकरी आणि कामगारांचे सरकार आहे. आम्ही समाजातील सर्वांचेच भले कसे होईल, याबाबत आम्ही गांभीर्याने विचार करतो. म्हणूनच आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना प्रति महिना 1500 रुपये म्हणजेच प्रतिवर्ष 18,000 रुपये मिळणार आहेत. याशिवाय त्यांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडरही दिले जाणार आहेत. या सर्व योजनांचे पैसे लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर वळते केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. (हेही वाचा, अमरावती मध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ’मध्ये लाच मागणं भोवलं; तलाठी निलंबित)

लाडक्या भावाचे काय?

लाडकी बहीण योजना आणली तेव्हा सरकारवर टीका करण्यात आली. बहीणीचे पाहिले मग लाडक्या भावाचे काय? त्यावरही सरकारने विचार केला आहे. म्हणूनच आम्ही राज्यातील विद्यार्थ्यांसाठी योजना आणत आहोत. जो तरुण इयत्ता 12 वी उत्तीर्ण झाला आहे त्याला दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये प्रत्येक महिन्याला दिले जाणार आहेत. ज्यामुळे या तरुणाला एखाद्या कारखान्यात वर्षभर अप्रेन्टिसशिप (Apprenticeship) करता येईल. त्याला तिथल्या कामाचा अनुभव मिळेल आणि त्याच्या नोकरीच्या संधी वाढतील. दुसऱ्या बाजूला आपण स्कील्ड मॅनपावर (कुशल कामगार) तयार करत आहोत, असेही ते म्हणाले.