महाराष्ट्रात डान्सबार बंदी कायम राहणार? सरकार अध्यादेश काढण्याच्या तयारीत, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाविरोधात अध्यादेश (Ordinance ) काढण्याचा विचार करत असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar ) यांनी आज दिली आहे.

(Archived, edited, representative images)

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मुंबईसह महाराष्ट्रात डान्सबार सुरु करण्यास संमती दिल्यानंतर आता महारष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. राजकीय पक्षांसोबतच अनेक सामान्य लोकांनीही या निर्णयावर टीका केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाविरोधात अध्यादेश (Ordinance ) काढण्याचा विचार करत असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar ) यांनी आज दिली आहे. मुंबईत पुन्हा एकदा छमछम वाजणार, डान्सबारवरील जाचक अटी सुप्रीम कोर्टाकडून रद्द

काय आहे सुधीर मुनगंटीवार यांचं मत?

राज्याच्या मंत्रीमंडळच्या साप्ताहिक बैठकीमध्ये सार्‍या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. लोकांच्या हिताचा आणि राज्याची सांस्ककृतिक प्रतिमा मलीन होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकार अध्यादेश काढण्यासाठीदेखील तयार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Maharashtra Finance Minister Sudhir Mungantiwar on SC verdict on Dance bars: After analysis of the SC order and discussions on it with the law & justice dept, if needed, we will issue an ordinance to stop dance bars in Mumbai. (File pic) pic.twitter.com/UneTPfWVlZ

डान्स बारच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनेदेखील सरकारवर निशाणा साधला आहे. डान्स बार बंदीचा निर्णय चांगला होता, पण सरकारचा मसूदा मजबूत नव्हता, आता जो अध्यादेश काढला जाईल तो तरी मजबूत असावा आणि कोर्टात टिकणारा असावा, असा टोला शिवसेनेने भाजपा सरकारला लगावला आहे.