महाराष्ट्र सरकारकडून चीनी कंपन्यांना तिसरा झटका! चीन सोबत होणारे 5000 कोटींचे 3 प्रोजेक्ट्स थांबवले
हे प्रोजेक्ट्स अलिकडे झालेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 इंव्हेस्टर समिट मध्ये करारबद्ध झाले होते. केंद्र सरकारला देखील याबाबत माहिती देण्यात आली आहे.
गलवाना घाटी (Galwan Ghati) मध्ये 20 भारतीय जवान शहीद झाल्यानंतर याला जबाबदार असणा-या चीनबद्दल भारताकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आगे. यामुळे सोशल मिडियावर चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा संदेश प्रचंड व्हायरल होत आहे. चीनशी कुठलाही व्यवहार न करण्याच्या दिशेने भारत सरकार पाऊल उचलत आहे.यात महाराष्ट्र सरकारनेही पुढाकार घेत चीनी कंपन्यांना मोठा धक्का दिला आहे. ज्यात महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) चीनशी होणार 3 प्रोजेक्ट्स थांबवले आहेत. या प्रोजेक्ट्सची एकूण किंमत जवळपास 5000 कोटी इतकी आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सरकारने हा निर्णय घेतला असून चीन कंपन्यांशी होणारे 3 करार थांबवले आहेत. हे प्रोजेक्ट्स अलिकडे झालेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 इंव्हेस्टर समिट मध्ये करारबद्ध झाले होते. केंद्र सरकारला देखील याबाबत माहिती देण्यात आली आहे. सरकारची चीनी उपकरणांवर बंदी, रेल्वेने दिलेले कंत्राट घेतले मागे; बीएसएनएल आणि एमटीएनएललाही निर्देश
करार झालेल्या प्रोजेक्ट्समध्ये पहिला ग्रेट वॉल मोटर्स चा प्रोजेक्ट होता. 3770 कोटी च्या या प्रकल्पात पुण्याजवळ ऑटोमोबाईल प्लांट लावणार होते. दुसार प्रॉजेक्ट PMI इलेक्ट्रो मोबिलिटी आणि फोटोन चा होता. ज्यात 1,000 कोटी मध्ये युनिट लावण्यात येणार होते. तर तिसरा प्रॉजेक्ट हिंगली इंजिनियरिंगचा होता जो 250 कोटींचा होता.