महाराष्ट्र विधानसभा सत्तेमध्ये समान वाट्यासाठी शिवसेना आमदार आक्रमक; अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पदाची मागणी

कॉंग्रेस पक्षालादेखील ऑफर देण्यात आली आहे असे मीडिया रिपोर्ट्स आहेत. याबाबत अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं यासाठी भाजपाकडून लेखी आश्वासन घ्यावं अशी मागणी देखील शिवसेना आमदारांनी केली आहे.

Shiv Sena | Photo Credits: Twitter

महाराष्ट्रामध्ये आज शिवसेना नवनिर्वचित आमदारांची 'मातोश्री' बंगल्यावर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट झाली. यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी भाजपासोबत सत्ता वाटपामध्ये समसमान वाटा घ्यावा अशी मागणी केली आहे. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी देखील आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. दरम्यान भाजपाने 50-50 चा फॉर्म्युला अमान्य केल्यास इतर पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो. कॉंग्रेस पक्षालादेखील ऑफर देण्यात आली आहे असे मीडिया रिपोर्ट्स आहेत. याबाबत अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं यासाठी भाजपाकडून लेखी आश्वासन घ्यावं अशी मागणी देखील शिवसेना आमदारांनी केली आहे. शिवसेना पक्षासोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस उत्सुक, बाळासाहेब थोरात यांच्याकडून खुली ऑफर

शिवसेना आमदारांनी सत्ता वाटपामध्ये समान मागणी केली असली तरीही सर्वाधिकार उद्धव ठाकरेंकडे आहेत. असे शिवसेना आमदारांकडून सांगण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपाला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. तासाभराच्या बैठकीनंतर शिवसेनेकडून सत्ता वाटपाबाबत ठाम निर्णय घेण्यात आली आहे. वरळी मध्ये शिवसेनेची पोस्टरबाजी; आदित्य ठाकरे यांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून अभिनंदन.

ANI Tweet

शिवसेनेसाठी मुख्यमंत्री हे पद आणि सत्तेतील समसमान वाटा महत्त्वाचा आहे. उपमुख्यमंत्रीपद सेनेसाठी दुय्यम आहे. सत्तास्थापनेचं सूत्र भाजपानं लेखी स्वरूपात दिल्यानंतर पुढील निर्णय दिवाळीनंतर घेण्यात येणार आहे,” अशी माहिती शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी मीडीयाशी बोलताना दिली आहे.