शिवसेना - भाजपा पक्षातील तणावग्रस्त संबंधांवर अमित शहा यांची पहिली प्रतिक्रिया; मुख्यमंत्रिपदावर शिवसेनेचा दावा अमान्य असल्याचा पुनरूच्चार
राष्ट्रपती राजवटीबाबत बोलताना त्यांनी सार्या पक्षांना समान वेळ दिल्याचं म्हणत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेची पाठराखण केली आहे.
महाराष्ट्रामध्ये शिवसेना -भाजपा पक्षाला मतदारांचा कौल देण्यात आला आहे. मात्र त्यावर आता दोन्ही पक्षांमध्ये 'मुख्यमंत्रीपदा'वरून रस्सीखेच सुरू असल्याने आता राजकीय पेच बिकट बनत चालला आहे. आज ANI ला देण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये अमित शहा यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदावरील दावा मान्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रपती राजवटीबाबत बोलताना त्यांनी सार्या पक्षांना समान वेळ दिल्याचं म्हणत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेची पाठराखण केली आहे. माझा मळवट मीच पुसला, पण दुसऱ्या सौभाग्याचे वाईट झाले याचा आनंद मानणाऱ्यांची ही विकृतीच महाराष्ट्राच्या मुळावर; शिवसेनेची भाजपवर 'मार्मिक' शब्दांत टोलेबाजी.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीसच विराजमान होतील असे ठरल्याचा पुनरूच्चार अमित शहा यांनी केला आहे. . शिवसेनेसोबत मुख्यमंत्रीपद वाटून घेऊ असं काहीही ठरलेलं नव्हतं असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं. पुढचे मुख्यमंत्री फडणवीसच असतील हे निवडणुकीच्या आधीच स्पष्ट झालं होतं मग त्यावेळी शिवसेनेने विरोध का केला नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
ANI Tweet
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 दरम्यान बंद दाराआड शिवसेनेशी काय चर्चा झाली ते सांगणं मला योग्य वाटत नाही कारण भारतीय जनता पक्षाचा माझ्यावर तसा संस्कार नाही असं म्हणत त्यांनी शिवसेनेसोबत काय फॉर्म्युला ठरला होता हे सांगणं टाळलं. आम्ही शिवसेनेचा कोणताही विश्वासघात केलेला नाही तर शिवसेनेने आमची साथ सोडली असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंसोबत काय बोलणं हे अमित शाह यांनी स्पष्ट केलं.