शिवसेना पक्षाला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाची बैठक पार पडणार
त्यानंतर आता शिवसेनेला राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडून सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण आल्याने हालचाली वेगाने वाढल्या आहेत. परंतु शिवसेना (Shiv Sena) राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना दुसऱ्या पक्षाकडून पाठिंबा मिळणे अत्यावश्यक आहे.
महाराष्ट्रात 9 नोव्हेंबरला विधासभेचा कार्यकाळ संपला तरीही सत्ता स्थापन झाले नाही. त्यानंतर आता शिवसेनेला राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडून सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण आल्याने हालचाली वेगाने वाढल्या आहेत. परंतु शिवसेना (Shiv Sena) राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना दुसऱ्या पक्षाकडून पाठिंबा मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे आता शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत आज सकाळी 10 वाजता काँग्रेस पक्षाची बैठक दिल्लीत (Delhi) पार पडणार आहे.तर काँग्रेस पक्षाचे प्रभारी मल्लिकाअर्जुन खर्गे यांनी राज्यात सत्ता स्थापनेबाबत काँग्रेसची बैठक होणार असल्याची अधिक माहिती दिली आहे. मात्र पक्षाचे हायकमांड काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहेच. पण जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. त्यामुळे सध्या आम्ही विरोधी पक्षात रहाणे योग्य असल्याचे खर्गे यांनी म्हटले आहे.
तसेच मुंबईत राष्ट्रवादी पक्षाची बैठक पार पडणार आहे. तर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही बैठक बोलावली असून त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील आणि पक्षातील अन्य नेतेमंडळी उपस्थिती लावणार आहेत. (राज्यात नवी युती पाहायला मिळणार? शिवसेना युतीतून बाहेर पडण्याची शक्यता)
दुसऱ्या बाजूला शिवसेना संजय राऊत यांनी आमच्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार असे म्हटले आहे. त्याचसोबत लक्ष्य गाठण्यासाठी शिवसेना एका नव्या वळवणार जाणार असल्याचा इशार सुद्धा त्यांनी ट्वीट करत दिला आहे. त्यामुळे आता शिवसेना राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन करणार का हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.