Maharashtra Government Formation Live News Updates: सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी महा विकास आघाडीचे नेते राजभवनावर पोहोचले
शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या पक्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी आणि राज्यापालांनी घेतलेले निर्णय याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी, निर्णय आणि राज्याच्या राजकारणातील ताज्या घडामडी 'लेटेस्टली मराठी' च्या माध्यमातून घ्या जाणून.
अखेर महाविकास आघाडीने जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपल्या 162 आमदारांना प्रथमच एका छताखाली आणले होते. आजच्या संयुक्त बैठकीमध्ये नवे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर तीनही पक्षांचे नेते सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनात पोहचले आहेत. त्यानंतर उद्या सर्व आमदारांचा शपथविधी पार पडेल.
शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे आभार व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. "तीस वर्ष ज्यांच्याशी मैत्री ठेवली त्यांनी विश्वास ठेवला नाही. मात्र, जे विरोधक होते त्यांनी विश्वास ठेवला," असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला. नव्या सरकार बद्दल बोलताना ते म्हणाले, "महाराष्ट्राच्या या आगामी सरकारमध्ये अनुभवी व ज्येष्ठ मंत्री-सहकारी असणार आहेत तसेच स्थापन होणारे सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे."
महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून आघाडी स्थापन करण्याचा ठराव शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मांडला आहे व या आघाडीच्या नावाला राजू शेट्टी, अबू आझमी, बच्चू कडू, कपिल पाटील यांचं अनुमोदन आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की अजित पवार हे आज होणाऱ्या महाविकासआघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. तसेच त्यांच्याशी कोणताही संपर्क देखील झाला नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ट्रायडेंट हॉटेलमध्ये दाखल झाले आहे. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे देखील येथे पोहोचले असून थोड्याच वेळात 'महाविकासआघाडी' च्या आमदारांची बैठक घेण्यात येणार आहे.
बहुमत सिद्ध न करू शकल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. आणि लगेचच महाराष्ट्रभर 'महाविकासआघाडी' च्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करायला सुरुवात केली आहे.
विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती झाली असून उद्या सकाळी 8 वाजता विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. हे अधिवेशन राज्यपालांनी बोलावलं आहे.
"शरद पवार यांनी 'महाविकासआघाडी' च्या बैठकीत सांगितलं आहे उद्धव ठाकरे हेच आमचे नेता होणार आणि तेच मुख्यमंत्री ही बनतील," नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केला गौप्यस्फोट. तसेच जे स्वतःला चाणक्य समजत होते त्यांना आज समजलंय की शरद पवार हेच खरे चाणक्य आहेत असं ही मलिक म्हणाले.
भाजपाचे कालिदास कोळंबर यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान थोड्याच वेळात त्यांंचा शपथविधी होणार आहे.
ट्रायडंट हॉटेल मध्ये महाविकास आघाडीची थोड्याच वेळात बैठक होणार आहे. या बैठकीला अजित पवार यांची उपथिती असू शकते. काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे या बैठकीला पोहचले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्त केला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान भाजपा नेत्यांना राजभवनाच्या गेटवरच रोखण्यात आलं. यावेळेस राज पुरोहित, विनोद तावडे, प्रवीण दरेकर सोबत आहेत.
देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असून आता नव्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती आता पुढे आली आहे. लवकरच महाविकास आघाडीचा नेता निवडला जाणार आहे. तसेच शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपी नेत्यांची बैठक होणार आहेत.
देवेंद्र फडणवीस सरकार 4 दिवसांत कोसळलं आहे. थोड्याच वेळात देणार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असून भाजपाकडे बहुमत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
देवेंद्र फडणवीस सरकार 4 दिवसांत कोसळलं आहे. थोड्याच वेळात देणार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असून भाजपाकडे बहुमत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
शिवसेनेसोबत मुख्यमंत्रीपदाचं डील झालं नव्हतं असा देवेंद्र फडणवीस यांचा पुनरूच्चार आज पत्रकार परिषदेमध्ये झाला आहे. दरम्यान भाजपासोबत चर्चा करण्याऐवजी त्यांंनी इतरांशी चर्चा केल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदाचा स्वीकार केल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेला सुरूवात झाली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. दरम्यान ते मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे पुढील 5 वर्षासाठी मुख्यमंत्री होणार असा संजय राऊत यांचा दावा आहे. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
महाविकास आघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरे यांच्या नावाला शरद पवार यांची पसंती असल्याचे सांगण्यात आलं आहे. आज संध्याकाळी मुंबईमध्ये पुन्हा शिवसेना, कॉंंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची एकत्र बैठक होणार असून शक्ती प्रदर्शन करणार आहेत.
Maharashtra Government Formation: राज्याच्या राजकारणात आणि विधिमंडळात कधी नव्हे तो इतका घटनात्मक आणि राजकीय पेच निर्माण झाला आहे. राज्याचे राजकारण कधीच इतके रसातळाला गेल्याचे इतिहासात पाहायला मिळत नाही. राज्यात असे पहिल्यांदाच घडत आहे की, राजकीय पक्ष आपली नैतिकता धाब्यावर बसवून सत्तापिपासून पणाचे दर्शन घडवत आहेत. हा घटनात्मक पेच न्यायालयाच्या दरबारीही जाऊन पोहोचला आहे. या पेचावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा राज्याच्या राजकारणावर तसेच, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजप यांच्यासहीत महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांच्या भविष्यावर आणि राजकारणावर प्रभाव टाकरणार आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस (Shiv Sena-Nationalist Congress-Congress) या पक्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा शपथविधी आणि राज्यापालांनी घेतलेले निर्णय याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी, निर्णय आणि राज्याच्या राजकारणातील ताज्या घडामडी 'लेटेस्टली मराठी' च्या माध्यमातून घ्या जाणून.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)