IPL Auction 2025 Live

Narayan Rane On Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचारी, लवकरच पुरावे देणार; भाजप नेते नारायण राणे यांचा इशारा

कोरोनाच्या परिस्थितीवरूनही त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

Narayan Rane And Uddhav Thackeray (Twitter)

महाराष्ट्रात (Maharashtra) परस्पर विचारधारेच्या तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi) स्थापन करत भाजपला मोठा धक्का दिला आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. दरम्यान, भाजपच्या राज्यातील नेत्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवरील हल्ले तीव्र केले आहेत. यातच भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनीही आक्रमक भुमिका घेतल्याचे दिसत आहे. तसेच ठाकरे सरकार हे भ्रष्टाचारी असून त्याचे पुरावेही तुमच्यासमोर सादर करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

नुकताच नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. दरम्यान, ठाकरे सरकारवर भष्टाचाराचा आरोप करत ते म्हणाले की, माझे नुकतेच अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. राज्यात सर्वत्र भ्रष्टाचार सुरु आहे. पाटबंधारेचे लिलाव करायला 15 टक्के खर्च करावा लागत आहे. कंत्राट मिळवायचे असेल तर, एकूण 15 टक्के रक्कम द्यावी लागत आहे. हा सगळा हिशेब मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. एवढेच नव्हेतर, त्याचे पुरावेही तुमच्यासमोर सादर करणार आहे', असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. हे देखील वाचा- Maharashtra Assembly Winter Session: राज्यातील प्राचीन मंदिराच्या संवर्धनासाठी स्वतंत्र्य निधी सरकारकडून दिला जाणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

तसेच कोरोनाच्या परिस्थितीवरूनही त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. कोरोनाची स्थिती हाताळण्यास राज्य सरकार यशस्वी ठरले आहे. याशिवाय, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली होती.

राज्यात सतत ठाकरे विरुद्ध राणे असा सामना पाहायला मिळत आहे. हे दोघेही एकमेकांवर टिका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. तसेच उद्धव ठाकरे यांनी अनेकदा भाषणातून राणेंवर टीका केली आहे. तर, नारायण राणे यांनीही पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.