Insurance Coverage For Warkari: लाखो वारकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू
राज्य सरकार कडून वारकर्यांकरिता ठिकठिकाणी आरोग्य पथकं तैनात केलेली असतात. त्यांच्याद्वारा मोफत औषधोपचार दिले जातात.
- Read in
- मराठी
महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीला पायी वारी करत येणार्या वारकर्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. विठ्ठल-रूक्मिणी वारकरी छत्र योजना लागू करत त्यांना संरक्षण दिले आहे. त्यामुळे आता वारी मध्ये अपघात होणं, मृत्यू होणं अशा परिस्थितीत सरकार कडून मदतीचा हात मिळणार आहे. मृत्यू झाल्यास कुटुंबाला 5 लाखांची मदत मिळणार आहे. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास 1 लाख रुपये आणि अंशत: अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये देण्यात येतील. वारीत आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35 हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळणार आहे.
पहा ट्वीट
वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण
• विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू
• लाखो वारकऱ्यांना दिलासा
पंढरपूरच्या आषाढीवारीतील वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी " विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना" लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि… pic.twitter.com/plBl8mdFjI
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 21, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2023 03:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

