Maharashtra Mission Begin Again: कन्टेमेंट झोन बाहेरील वॉटर स्पोर्ट्स, नौका विहार, करमणूक उद्यानं सुरु करण्यास राज्य सरकारची परवानगी; पर्यटन स्थळं खुली करण्यासही मुभा

परंतु, यातून कन्टेमेंट झोन वगळण्यात आला होता. आता मात्र राज्य सरकारने कन्टेमेंट झोन मधील वॉटर स्पोर्ट्स, नौका विहार, करमणूक उद्यानं आणि indoor entertainment activities सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

Unlock | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

कोविड-19 (Covid-19) संकटामुळे बंद असलेल्या अनेक सेवा सुविधा महाराष्ट्र मिशन बिगेन अगेन (Maharashtra Mission Begin Again) च्या अंतर्गत पुन्हा सुरु करण्यात आल्या. परंतु, यातून कन्टेमेंट झोन (Containment Zone) वगळण्यात आला होता. आता देखील राज्य सरकारने कन्टेमेंट झोन बाहेरील वॉटर स्पोर्ट्स (WaterSports), नौका विहार (Nauka Vihar), करमणूक उद्यानं (Amusement Parks) आणि indoor entertainment activities सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर कन्टेमेंट झोन बाहेरील पर्यटन स्थळे पुन्हा सुरु करण्यासही मुभा देण्यात आली आहे. (मुंबईमध्ये कोरोना व्हायरस लसीकरणासाठी BMC ची जोरदार तयारी; कर्मचार्‍यांना 7 जानेवारीपर्यंत प्रशिक्षण, 80 हजार Health Workers ची नोंदणी)

गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची नियंत्रित येणारी संख्या लक्षात घेता नागरिकांची लॉकडाऊनच्या कडक नियमांतून सुटका करण्यात आली आहे. तसंच लवकरच लसीकरणालाही सुरुवात होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. यापूर्वी देखील बंद असलेल्या सेवा-सुविधा पूर्ववत करण्यात आल्या होत्या. पुढील वर्षात सर्वसामान्यांसाठी लोकल सेवाही सुरु करण्याचा मानस असल्याचे संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत.

ANI Tweet: 

कोरोना बाधितांची संख्या ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर वाढू नये आणि कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा धोका टाळण्यासाठी राज्यातील पालिका हद्दीत 5 जानेवारी पर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. या काळात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत घराबाहेर पडण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. (Night Curfew in Pune: पुण्याच्या ग्रामीण भागातही नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता)

दरम्यान, राज्यात कालच्या दिवसांत 3106 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून 4122 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या 58376 सक्रीय रुग्ण आहेत. आतापर्यंत 1794080 रुग्ण बरे झाले असून राज्याचा रिकव्हरी रेट 94.3% इतका आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif